कोथरूड ( प्रतिनिधी ) : दिवगी मेटल वेअर्स प्रा. लि. शिवरे , या कंपनीतील कामगार वाय . बी. पटेल हे सेवा निवृत्त आहेत . त्यांना मनक्याचा आजार झाला व त्यांना अपंगत्व आले . त्यामुळे त्यांच्या कामावरील सेवा निवृत्त सहकारी कामगारांनी त्यांना तिन चाकी इलेक्ट्रीकल सायकल भेट दिली .
वाय . बी . पटेल यांचे सर्वांबरोबर चांगले सलोख्याचे सबंध होते . ते प्रत्येकाच्या मदतिला व अडीअडचनीस जात असत . ते कामगार परिवार या संघटनेचे सदस्य आहेत . त्यामुळे त्यांच्या मदतीला त्यांच्या सेवा काळातील सहकाऱ्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरवले व सर्वांनी मिळून त्यांना तीनचाकी इलेक्ट्रीकल वाहत भेट म्हणून दिली .

या कार्यासाठी नवनाथ सोरटे, अजित शॉमेल, मजित सिंग, यू आर गिरी, जितू होदलेकर, यु. डी. पवार, दिलीप ओव्हळ, रमेश खुडे, राजा गुजाळ, जी, एम, पवार, शेख अप्पा मोकटे, कुबरे व इतर कामगार यांनी सहकार्य केले .