बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं, राज ठाकरे म्हंटले मी नाही पिणार . .

बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं, राज ठाकरे म्हंटले मी नाही पिणार . .

पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा . राज ठाकरे
पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा . राज ठाकरे

पिंपरी – चिंचवड : महाकुंभ 2025 मध्ये पवित्र स्नानासाठी नाना सेलिब्रिटींपासून ते दिग्गज राजकारण्यांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांनी डुबकी मारली. महाकुंभाची जगभर चर्चा झाली. या महाकुंभा मेळ्यात कोट्यवधी लोक पोहचले.

गर्दीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. पिंपरी चिंचवडमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान बॅटिंग केली. महाकुंभाविषयीचा एक किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगताच एकच हश्या पिकला.

 

इतकी पापं करता कशाला?

 

राज ठाकरे यांनी एका बैठकीतील किस्सा सांगितला. त्यात काही जण बैठकीला हजर झाले नव्हते. त्यांनी याविषयी झाडाझडती घेतली होती. “मुंबईत एक बैठक लावली होती. मुंबईतील शाखा अध्यक्ष , उपाध्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं, कारणं एक एक दिली. घरचे ते आजारी, हे होतं, ते होतं. पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला. हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना?” असे राज ठाकरे म्हणताच पदाधिकार्‍यांमध्ये आज खसखस पिकली.

 

म्हटलं हड….

 

आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार, असे राज ठाकरे म्हणताच कार्यक्रमस्थळी हस्याचा कडेलोट झाला. त्यांनी यावेळी धार्मिक अंधश्रद्धेवर चांगलाच आसूड ओढला. त्यांनी या गोष्टींबाबत समाजाचे प्रबोधन केले. राज ठाकरे यांनी धार्मिक अंधश्रद्धांवर हंटर हाणला.

 

ते म्हणाले, “मला सांगा, पूर्वीच्या काळी ठिक होतं. आता सोशल मीडिया आला. माणसं, तिथं आलेल्या बायाबिया घासतात. आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी. अरे कोण पेईल ते पाणी. चला आताच करोना गेला. त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले. तिकडे जाऊन आंघोळ करतात. मी कित्येक स्विमिंग पुल पाहिले. आधी निळे होते. नंतर हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्याने तिथे काही तरी केलं, ते मी इथे पितो.”

 

श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. एक नदी या देशातील स्वच्छ नाही. आणि आम्ही काय नदीला माता. परदेशातील नद्या स्वच्छ. ते काही माता म्हणत नाही. तरी नद्या स्वच्छ. आपल्याकडे पोल्युशनचं पाणी अस्वच्छ. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय गंगा साफ होणार. मध्ये राज कपूरने पिक्चर काढला. त्यात वेगळीच गंगा, असा चिमटा त्यांनी काढताच सभागृहात हास्य पिकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click To Whatsapp