साहित्यिक वि. दा पिंगळे यांना आचार्य अत्रे साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

पुणे ( प्रतिनिधी) : विदिशा विचार मंचच्या वतीने आचार्य अत्रे साहित्यरत्न पुरस्कार हा सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते मसाप चे कार्यवाह साहित्यिक वि. दा पिंगळे यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील टिळक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, हा पुरस्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी ग्रंथपाल व संशोधन अधिकारी विधानमंडळ महाराष्ट्र राज्य.मा. बा.बा .वाघमारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, विदिशा विचार मंचच्या कार्यकारी संचालक ममता क्षेमकल्याणी, प्रा. वा.ना. आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रामाणिक भावनेतून कार्या केले तर समाज आपली दखल घेत राहतो या भूमिकेतून मी साहित्य क्षेत्रामध्ये गेली 25 वर्ष निष्ठेने काम करत आहे. या साहित्याच्या प्रवासात अनेक थोरामोठ्यांचा आशीर्वाद, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांचा सहवास मला लाभला. हीच मी माझ्या आयुष्यातील मोठी संपत्ती असल्याचे वि. दा. पिंगळे यांनी यावेळी सांगितले.