पुणे (प्रतिनिधी ) : समाजिक कार्यकर्ते तसेच मनसेचे कोथरूड उपअध्यक्ष आनंद बंडू पाटील यांची भारतीय ( इंडियन ) ह्युमन राईटस् कौन्सील च्या महाराष्ट्र सरचिटनीस पदी नियुक्ती करण्यात आली . सदर नियुक्ती कौन्सील चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . एम पवनकल्यान यांचे हस्ते करण्यात आली यावेळी त्यांना प्रमाणपत्र व आय कार्ड देण्यात आले .
यावेळी उपअध्यक्ष अब्दुल रशीद सरकार , राष्ट्रीय सचिव शहादत अन्सारी व परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते . सर्वांनी पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
पाटील यांनी पद स्विकारताना आनंद व्यक्त केला . ते म्हणाले मी सोशीत पिडीत व न्यायाची अपेक्षा करणाऱ्या सर्वांसाठी प्रामाणिक काम करत राहणार तसेच परिषदेशी प्रामाणिक राहणार व कसलेही कार्य निष्ठेने पार पाठणार असल्याचे त्यांनी सांगितले .