पौडमध्ये मुस्लिम तरुणाने मंदिरात केले अश्लील कृत्य; संतप्त ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर त्याच्यासह वडिलांना अटक, परिसरात तणाव.
पौड (पुणे) – पुणे जिल्ह्यातील पौड गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिरात चक्क एका मुस्लिम तरुणाने घुसून अश्लील कृत्य केल्याने संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
चांद शेख (वय १९) असं या तरुणाचं नाव असून, त्याने मंदिरात प्रवेश करत दरवाजा आतून बंद केला आणि पवित्र मंदिरात अश्लील चाळे करत अन्नपूर्णा देवीच्या प्रतिमेचा अपमान केला. त्याने देवीचा फोटो फाडून त्या फोटोवरही अशोभनीय वर्तन केले. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण विकृत कृती कैद झाली आहे.
या संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर तात्काळ कारवाई करत पौड पोलिसांनी आरोपी चांद शेख आणि त्याचा वडील निशाद शादाब शेख यांना अटक केली. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या वडिलांनी सार्वजनिकरित्या या कृत्याचे समर्थन केल्याने नागरिकांचा संताप आणखीनच वाढला आहे.
“हे केवळ मंदिराचे नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या श्रद्धेचे अपमान आहे. पोलिसांनी याची गतीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोघांनाही कठोर शिक्षा करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी सांगितले की “या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल”