Home » ब्लॉग » शिरूर भाजपाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 153 रक्तदात्यांचा सहभाग

शिरूर भाजपाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 153 रक्तदात्यांचा सहभाग

Facebook
Twitter
WhatsApp
530 Views

शिरूर भाजपाच्या रक्तदान शिबिरात 153 रक्तदात्यांचा सहभाग; सैनिकांसाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी घेतलेले पाऊल.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशसेवेची नाळ जपणारे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सीमेवरील सैनिकांसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी आयोजित या शिबिरात तब्बल 153 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं.भाजपा तालुकाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या पुढाकारातून अल्पावधीत या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
“भारत-पाक सीमेवर तणावाची परिस्थिती असताना सैनिकांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे,” असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी व्यक्त केले.
या रक्तदान शिबिराला पुणे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख, ज्येष्ठ नेते कैलासदादा नरके, क्रीडा आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे संचालक सत्यनारायण ढेरंगे, प्रशांत काळभोर, राहुल वाकचौरे, म्हकू भोसले, राजाभाऊ मांढरे, नवनाथ सासवडे, रवींद्र दोरगे, अनिल नवले, विठ्ठल वाघ, अॅड. सुरेश भुजबळ, अशोक हरगुडे, नवनाथ भुजबळ, नितीन गव्हाणे,सरपंच भरत भुजबळ, अर्जुन तोडकर, दादा जगताप, शंकरराव भुजबळ, विजय साठे, अनिकेत गव्हाणे, अविनाश वीर, पंकज बोबडे, वसंत भुजबळ, प्रवीण फडतरे, रजनीकांत भुजबळ, प्रिया बिरादार, सुजाता पाटील, संतोष ढमढेरे, महेंद्र दरेकर, सोमनाथ ढेरंगे, अभी सव्वाशे, नितीन आफळे, हर्षवर्धन काळभोर, सहदेव गवळी, निलेश सात्रस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर शिबिर यशस्वी करण्यासाठी नितीन भुजबळ, रोहित सैनी, विनोद सोनवणे, दिनेश राऊत,नितीन थोरात,नितीन शिंदे,सचिन गोरे यांनी विशेष मेहनत घेतली.
हा उपक्रम म्हणजे राष्ट्रभक्तीची जिवंत प्रेरणा ठरणारा संदेश असून, युवकांनी सामाजिक कार्यात अशा प्रकारे पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!