Home » राजकारण » वाघोलीत महावितरणची बेफिकीरी: रस्त्याच्या कडेला असलेले डीपी बॉक्स अपघाताच्या उंबरठ्यावर

वाघोलीत महावितरणची बेफिकीरी: रस्त्याच्या कडेला असलेले डीपी बॉक्स अपघाताच्या उंबरठ्यावर

Facebook
Twitter
WhatsApp
91 Views
वाघोलीतील आव्हाळवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेला महावितरणचा डीपी बॉक्स खराब स्थितीत असून, तो दगडांच्या आधारावर उभा.. वायर उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला … नागरिकांच्या तक्रारी असूनही महावितरणकडून दुर्लक्ष
वाघोली परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्याच्या अडचणींबरोबरच आता जीव धोक्यात घालणाऱ्या महावितरणच्या दुर्लक्षित यंत्रणेचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील आव्हाळवाडी फाट्या जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत वितरण बॉक्स (DP बॉक्स) खराब स्थितीत असून, तो बॉक्स अक्षरशः रस्त्यावर पडण्याच्या अवस्थेत आहेत.तर त्या डीपी बॉक्सला दगडांचा आधार दिल्याचे दिसत आहे
नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे डीपी बॉक्स फाटलेले, गंजलेले किंवा उघडे असून त्यातून वायर बाहेर आलेली आहे. यामुळे अपघाताचा धोका सतत निर्माण झाला आहे, विशेषतः लहान मुलं व शालेय विद्यार्थी यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.
स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली चिंता “महावितरणचे अधिकारी घटनास्थळी येतात, पाहणी करतात पण पुढे काहीच घडत नाही. इतक्या वेळा तक्रार करूनही काही बदल नाही,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
महावितरणचे दुर्लक्ष – कोण घेणार जबाबदारी? या डीपी बॉक्समुळे कोणताही अनर्थ झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि महावितरण प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!