Home » ताज्या बातम्या » अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वाघोलीत स्वच्छता अभियान

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वाघोलीत स्वच्छता अभियान

Facebook
Twitter
WhatsApp
106 Views
वाघोली, ता. हवेली – कर्तृत्व, दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेचं तेजस्वी प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, हवेली तालुका यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत वाघोली येथील श्री वाघेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या अभियानात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, हवेली तालुका अध्यक्ष विजय जाचक, जिल्हा सचिव प्रदीप सातव, योगिता सातव, विद्या पाटील, रुक्मिणी सिंह तसेच शिवदास पवार गणेश जाधव कड मामा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
स्वच्छता हा खरा श्रद्धांजलीचा मार्ग मानत, या उपक्रमाद्वारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!