कोंढवे धावडे (प्रतिनिधी) – कोंढवे धावडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथाची सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष आरती, नैवेद्य व भक्तिभावाने पूजा करण्यात आली. प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांकडून नियमितपणे हा विधी अत्यंत श्रद्धा आणि निष्ठेने पार पडतो.
गावाच्या सुख-समृद्धीसाठी आणि संकटापासून बचाव व्हावा, यासाठी काळभैरवनाथाच्या चरणी आरती करून ग्रामस्थ आशीर्वाद घेतात. यावेळी आरतीचा मान गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष शिवाजी तात्या धावडे यांना देण्यात आला.
विशेष म्हणजे, काळभैरवाच्या मंदिरात आरतीसाठी ब्लूटूथ स्पीकर भेट म्हणून शिवाजी तात्या धावडे यांनी मा. सरपंच बबन अण्णा धावडे, मा. सरपंच तुकाराम भाऊ मोरे आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवस्थानास अर्पण केला.
कार्यक्रमास साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत (संस्थापक अध्यक्ष – संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट व प्रवक्ते – अखिल भारतीय छावा संघटना) यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी सांगितले की, “कालभैरवाची कर्तव्यरूपी सेवा हीच खरी कर्मरूपी सेवा आहे.” अशा भावपूर्ण शब्दांत त्यांनी आपल्या श्रद्धेची प्रचीती दिली.
यावेळी गुरव पांडा भाऊ धोंडगे, ज्येष्ठ सा.का. भीमराव धोंडगे, श्रीकांत तात्या धावडे, बाळूसाहेब मोकाशी, नारायणजी सरपाटील, मारुती तावरे, दादासाहेब साळुंखे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होत, भाविकांनी कोंढवे धावडे गावाच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना केली. अशा प्रकारे अध्यात्म, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारा हा भक्तिभावाचा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.