Home » महाराष्ट्र » श्री शिवराज्याभिषेकाची सांगता “स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… ” मोहीमेने

श्री शिवराज्याभिषेकाची सांगता “स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… ” मोहीमेने 

Facebook
Twitter
WhatsApp
189 Views

श्री शिवराज्याभिषेकाची सांगता
“स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… ” मोहीमेने 

रायगड प्रतिनिधी : किल्ले रायगडावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा जय घोषात संपूर्ण रायगड दणाणून गेला. या शिव राज्याभिषेक सोहळ्यास महाराष्ट्रातून नव्हे तर संपुर्ण भारत देशातून लाखो शिवभक्त हजर होते. अतिशय आनंदम वातावरण हा सोहळा पार पडला. राज्याभिषेक सोहळ्याची सांगता झाल्यावर दुपारी गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने किल्ले रायगडावरील होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर परिसर, टकमक टोक,राजवाडा,नागारखणा या भागातील रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स तसेच प्लास्टिक व इतर कचरा उचलण्यात आला. पाईवाटेने गड उतार होताना पायवाटेत पडलेला कचरा व प्लास्टिक बॉटल्स असे जवळपास २५ गॅरबेज बॅग भरून कचरा उचलून तो संस्थेच्या दुर्ग सौनिकांनी गडाखाली आणून ठेवला. गड किल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने गेले ५ वर्ष झाली हा उपक्रम राबवण्यात येतो. या मोहीम मध्ये संस्थेचे २२ दुर्ग सौनिक व दुर्गसेविका सहभागी झाले होते. या मोहीमेचे आयोजन गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या मार्कत करण्यात आले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!