पुणे : प्रतिनिधी
“संविधान समता दिंडी” ! हि दिंडी सुरू होऊन १२ वर्ष झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशाच्या विविध राज्यांतुन या “संविधान समता दिंडी” मध्ये वारकरी संप्रदायीक सहभागी होतात. यावेळी यवत ते वरवंड दरम्यान पालखी सोहळ्यात
विविध राजकीय पक्षातील, सामाजिक संघटना, साहित्य क्षेत्रातील मान्यवर या दिंडीत सहभागी होते. आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या आमदार विद्याताई चव्हाण, माजी आमदार मोहनदादा जोशी, माजी नगर सेवक अभय छाजेड, ह.भ.प. समाधान महाराज देशमुख, समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक लांबे, समाजवादी पार्टीचे सरचिटणीस दत्ताभाऊ पाकिरे, प्रकाश डोंबाले, सविता ताई शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. या संविधान समता दिंडी चे नेतृत्व हभप सोन्नर महाराज यांनी केले होते.