भाजप नेते सचिन विष्णू दांगट यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पुणे : प्रतिनिधी
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवणे येथील भाजपाचे युवा नेते सचिन विष्णु दांगट यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी रिक्षा चालकांना, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, लहान मुलांना खाऊ वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय चिञकला स्पर्धा व विविध सामाजिक उपक्रम यानिमित्त घेण्यात आले. तसेच प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.
या उपक्रमात शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, कोपरे व परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, मा. उपमहापौर दिलीप बराटे, जि.प. माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, माजी नगरसेवक किरण बारटक्के, भाजपा नेते अरुण दांगट, विधानसभेचे अध्यक्ष गणेश वरपे, रूपेश घुले, भारतभूषण बराटे, राजीव पाटील, किशोर पोकळे, सागर भुमकर, अनिल मते, विश्वकर्मा कमिटी शहराध्यक्ष किशोर कदम, सरपंच सुभाष नाणेकर, उमेश सरपाटील, रमेश धावडे, अभिजीत धावडे, भगवान मोरे, गणेश वांजळे, संतोष देशमुख, व मान्यवर उपस्थित होते. गेल्या चौदा वर्षापासून जनतेच्या विविध प्रश्न घेऊन लढत असताना आगामी काळात ही जनसेवेचा हा उपक्रम कायमस्वरूपी राबवला जाणार असल्याचे दांगट यांनी यावेळी सांगितले