पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रीय योग दिनानिमित्त गोकुळ नगर पठार वारजे येथील यशवंत एज्युकेशन सोशल फाउंडेशन मध्ये योगा घेण्यात आला. यावेळी योग शिक्षिका सुरेखा महादेव बेंद्रे यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करीत
योगामुळे शारीरिक व्याधी नष्ट होऊन आपणास शरीर सुदृढ राहण्यासाठी कसा फायदा होतो याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या संस्थापिका निलम डोळसकर यांनी केले. या उपक्रमात शितल पाटील, जयश्री कुंभार, मनीषा अंडील, वैशाली परब, इशिता होडे, उमा शिंदे, प्रियांका बोरकर, आलोक कांबळे, आनंदी दुपारगुडे तसेच पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.