आरपीआयच्या शहर सचिव पदी अरविंद शिंदे यांची फेरनिवड

पुणे (प्रतिनिधी ) : वारजे माळवाडी भागातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अरविंद शिंदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर सचिव पदी फेरनिवड करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष संजय भाऊ सोनवणे यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले प्रसंगी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुरामजी वाडेकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असीत भाऊ गांगुर्डे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र भाऊ चव्हाण माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम भाऊ सदाफुले, युवक शहराध्यक्ष वीरेन साठे आदी उपस्थित होते विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढीसाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे व येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूक मध्ये रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी फेरनिवड झाल्या नंतर सांगितले.






