उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेत रंगले कवी संमेलन

पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या काव्य संमेलनात कवींनी विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर करत संमेलनात रंगत भरली. यावेळी कवी उमा व्यास यांनी सादर केलेल्या एक दिवस तू बाई होऊन बघ या कवितेने उपस्थितांची दादा मिळाली.
कवि नंदकिशोर बोधई यांनी श्रावणी सरी ही कविता सादर केली. शोभा जुमडे यांनी सुखाचं दान ही गझल सादर केली. बाळासाहेब पानसे वारकरी या कवितेने वारकऱ्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतला. रामचंद्र पाचुलकर यांनी चंद्रमुखी ही कविता सादर केली. अंजली वाडकर यांची भागवत गीतेची शिकवण, ज्योत्स्ना तानवडे यांनी सादर केलेली अद्वैत, विजय जाधव यांच्या राजाच्या डोक्याला शिंग, तर विनायक देशपांडे यांनी सादर केलेली दिवस आजचा आनंदाचा या कवितांनी मैफलीत रंग भरले. यावेळी सहभागी कवी व कवयत्रींचा सन्मान करण्यात आला. ३५ कवींनी या काव्य संमेलनात सहभाग घेतला.
कवि संमेलनाचे आयोजन राजयोग प्रतिष्ठान व माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कवी बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अक्रूर कुदळे, प्रदेश प्रवक्ते विवेक धुमाळे, युवक अध्यक्ष सागर कोल्हे, नंदकिशोर बोधाई, साहित्यिक वि. दा.पिंगळे, डी.के. जोशी, सुरेश जाधव, मानसी नलावडे, माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ आदी उपस्थित होते. या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन अतुल घटवाई यांनी केले तर आभार साधना कुलकर्णी यांनी मानले.
फोटो ओळ : वारजे येथे काव्य संमेलनात सहभागी कवींचा सन्मान करताना मान्यवर






