Home » ताज्या बातम्या » किल्ले सिंहगड १,००७ वेळा चढाई व उतरण्याचा पराक्रम. यशस्वीरीत्य पुर्ण..

किल्ले सिंहगड १,००७ वेळा चढाई व उतरण्याचा पराक्रम. यशस्वीरीत्य पुर्ण..

Facebook
Twitter
WhatsApp
573 Views

किल्ले सिंहगड १,००७ वेळा चढाई व उतरण्याचा पराक्रम. यशस्वीरीत्य पुर्ण..

श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्हीं निष्ठावंत मावळे हे मनोमन विचार करून गड प्रेमी, सह्याद्री प्रेमी सिंहगड ट्रॅकरचे शिवभक्त श्री .संगम किसन वाघमारे (वय३७) यांनी दि ५ ऑक्टोबर २०२५ दिवशी किल्ले सिंहगडची १००७ वेळा चढन उतरण पुर्ण केली.. वाघमारे यांनी किल्ले सिंहगडला चालण्याची पहिली सुरूवात २००८ केली. आर्मीमध्ये कामाला लागायचं असेल तर आपला फिटनेस चांगला पाहिजे ही जिद्द मनाशी बाळगून त्यांनी सतत सिंहगड चढुन -उतारन्याचा छंद मनात धरला. या अनुषंगाने ते सतत किल्ले सिंहगड येथे ट्रेकिंगला जात असे. २०१२पासुन आपण किती वेळा वर खाली सिंहगड करतो.हे मोजले पाहिजे अशी संकल्पना सागर वाघमारे,मयुर देवराम पवार,सागर धिवार, देवराम गवारणे,शिवकुमार भरेकर यांनी वाघमारे यांना सुचवली.
वाघमारे यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील चिव्हे वाडी , परंतू सध्या ते कोंढवे -धावडे पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे. वाघमारे यांनी सुरुवातीला २५ मिनिटात सिंहगड किल्ला सर करण्याचा विक्रम केला आहे .आता ते ३० मिनिटात पायथा ते सिंहगड किल्ल्यावर पोचतात याच बरोबर त्यांनी किल्ले राजगड ते किल्ले तोरणा असा तीन वेळा ट्रेक केला आहे. त्यांच्या समवेत सोमनाथ पोकळे, विकास दांगट अभिजित शिंदे,मनोहर टेबघरे,गोपाळ गिलेनू, महेंद्र दांगट, गणेश फाटे , अशोक उरीट,भुषण दामगुडे ,शुभम सरडे, चंदकांत सांबरे विजय वांजळे ,
हा मित्र परिवार सोबत असतो. शरीराची जबरदस्त मेहनत, मनाची प्रबळ ईच्छा शक्ती. व सह्याद्रीची आवड असल्याने त्यांना हे शक्य झाले या निमित्त वाघमारे यांचा कोढवे धावडे येथे तसेच किल्ले सिंहगड सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे स्मारकापाशी सिंहगड ट्रॅकर, शिवप्रेमी यांच्या वतीने साहसी ट्रॅकर गुण गौरव म्हणून सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!