एका विमानात एक प्रसंग घडला, जो सगळ्यांना शिकवून गेला…
AI888 क्रमांकाचं बिझनेस क्लासचं विमान सिंगापूरहून मुंबईकडे निघणार होतं.
चेक-इन काउंटरवर एक वयोवृद्ध गृहस्थ आले. साधा फिक्का शर्ट, खाकी पॅन्ट, पायात प्लास्टिकच्या चपला, आणि हातात एक जुनी कापडाची पिशवी — एवढंच त्यांचं सामान.
कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मग तिकिटाकडे.


बिझनेस क्लासचं तिकिट!😳 ते थोडेसे थबकले पण आदराने त्यांना व्हीआयपी लाउंजमध्ये नेलं.
सीट नंबर 1A — सर्वात महागडी सीट — ती त्यांची होती.
एअरहोस्टेस थोडी गोंधळली आणि नम्रतेने विचारलं,
“सर, तुमचं तिकिट पुन्हा पाहू शकते का?”
गृहस्थ हसले, शांतपणे तिकिट दिलं.
तिकिट खरंच बिझनेस क्लासचंच होतं. पण तिच्या नजरेत अजूनही शंका होतीच.
शेजारच्या 1C सीटवर बसलेला तरुण सूट-बूटात, हातात रोलेक्सचं घड्याळ — त्याने त्या आजोबांकडे वरखाली पाहिलं आणि फोनकडे नजर वळवली.
विमान उडालं. जेवणाची वेळ झाली. तेव्हा एअरहोस्टेस ने जेवण वाढून आणलं,
वाग्यू बीफ, फ्रेंच वाइन, इटालियन ब्रेड, आणि डेझर्टसाठी पन्ना कोट्टा हा मेनू होता.
त्या वयोवृद्धाने हळूच विचारले,
“माफ करा, मला जेवण मिळेल का?”
एअरहोस्टेस थोडं हसली पण शांतपणे म्हणाली,
“सर, आज बिझनेस क्लासचं जेवण लिमिटेड आहे. नियमित व्हीआयपींनाच प्राधान्य दिलं जातं. आशा करते की तुम्ही समजून घ्याल ”
ते फक्त हसले, काही बोलले नाहीत.
काही प्रवासी कुजबुजले,
“बिझनेस क्लासचं तिकिट घेतलंय, पण क्लास दिसत नाही.”
दोन तास ते फक्त शांतपणे खिडकीबाहेर पाहत राहिले.
विमान मुंबईला उतरलं. सर्व प्रवासी उतरले, पण त्या गृहस्थांना थांबायला सांगितलं गेलं.
अचानक केबिनचं दार उघडलं — काळ्या सूटमधले काही लोक आत आले.
संपूर्ण विमान शांत झालं.
आघाडीचा अधिकारी नम्रतेने वाकला —
“सर, स्वागत आहे! उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला सामान्य प्रवासी म्हणून प्रवास करावा लागला. प्रधानमंत्री कार्यालयातून थेट आदेश आले होते.”
हे ऐकताच सर्व प्रवासी — एअरहोस्टेस, पायलट, आणि ते सूट-बूटातले लोक — थबकले.
एअरहोस्टेस घाबरून पुढे आली,
“सॉरी सर… मला माहिती नव्हतं… मी ओळखलं नाही…”
ते शांतपणे म्हणाले,
“बेटा, मी पण सांगितलं नव्हतं की मी कोण आहे. माणूस ओळखायचा असेल, तर कपड्यांनी नाही — वागणुकीने ओळखा.”
ते उठले, जुनी पिशवी उचलली आणि बाहेर गेले.
एअरपोर्टवर ब्लॅक बीएमडब्ल्यू आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांची वाट पाहत होता.
कॅमेरे चमकले.
त्या तरुणाला तेव्हाच कळलं — ज्याला तो “गरीब म्हातारा” समजत होता, तो खरं तर भारताच्या संरक्षण संशोधन संस्थेचा माजी प्रमुख वैज्ञानिक — डॉ. अनंत अय्यर होता, ज्यांच्या संशोधनामुळे भारतीय वायुसेना आजही आकाशात उडते आणि ज्याने आपल्या आयुष्यातले ४० वर्षे देशाच्या संरक्षणासाठी बहाल केलेत.
जाताना त्यांनी फक्त एवढंच म्हटलं —
“विमान आकाशात असो वा जमिनीवर.. उंची कपड्यांनी नाही, कर्मांनी ठरते.”
✦ शिकवण:
कधीही एखाद्याला त्याच्या कपड्यांवरून, बोलण्यावरून किंवा साधेपणामुळे कमी लेखू नका.
कारण जे सर्वात साधं दिसतं, तेच अनेकदा सर्वात महान असतं.
जर पोस्ट आवडली असेल तर फॉलो नक्की करा —






