लोकमान्य टिळक व गणेशोत्सव वैचारिक स्पर्धा 2025 व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
पुजे (प्रतिनिधी ) : स्वर्गीय वासुदेव गुप्ता सेवा कार्य फाउंडेशन आयोजित लोकमान्य टिळक व गणेशोत्सव वैचारिक स्पर्धा 2025 व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री चेतन जी गुप्ता व संस्थापक श्रीमती मीरा जी गुप्ता यांच्याकडून करण्यात आले. हा कार्यक्रम अंबर हॉल ,कोथरूड, पुणे येथे १६ ऑक्टोबर २०१५ ला संपन्न झाला . या कार्यक्रमास पुण्यातून विविध भागातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सहभाग घेतला व उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री प्रविण जी महामुनी(पूर्व कुटुंब प्रबोधन संयोजक, पुणे व बाल विभाग सदस्य), श्री गिरीजी धर्माधिकारी( संचालक पुणे पंप्स प्रायव्हेट लिमिटेड) व श्री अमोल जी जोशी (संभाजी भाग सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) हे होते तसेच परीक्षक श्रीमती उल्काताई मोकासदार( लेखिका) हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशालजी कणसे यांनी केले कार्यक्रमास श्री राकेश जी शिंदे, श्री राकेश जी सावंत, श्री अजय जी धनवडे ,श्री ओंकार जी मनवलीकर, श्री आप्पा कुलकर्णी ,श्री उमेश वाफगावकर ,श्री अनंतजी वांजळे, श्री देवभानकर सर व अन्य समाजातील नामांकित व्यक्तींनी उपस्थिती दर्शविली सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला व प्रविण जी महामुनी यांच्या प्रबोधनाने उत्साहीत झाले.






