सर्वसामान्य नागरिकांच्या आणि कामाच्या जोरावर रेश्माताई जयेश शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार.
“आम्ही फक्त सर्वसामान्य नागरिकांचेच कार्यकर्ते” – जयेश शिंदे यांनी अफवा पसरवणाऱ्यांना केले स्पष्ट .
सध्या नवे विचार, नवी उमेदवारी आणि बदलाची आशा यांची चर्चा लागली रंगू.
तळेगाव : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव जिल्हा परिषद गटात चुरशीची चर्चा जोर धरत आहे. या गटाचे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण असल्याने राजकीय उत्सुकता अधिक वाढली आहे.
भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष जयेश शिंदे गेल्या काही दिवसांपासून या गटातून जिल्हा परिषदेसाठी तयारी करत होते. मात्र महिला आरक्षणामुळे त्यांनी पत्नी रेश्माताई जयेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही व्यक्तीकडून जिल्हा परिषद गटात जाणूनबुजून अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देत जयेश शिंदे यांनी विठ्ठलवाडी ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांना सोबत घेत बैठक घेऊन सांगितले की“आम्ही कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत. आम्ही फक्त सर्वसामान्य नागरिकांचे कार्यकर्ते आहोत; आम्ही कोणाचे वैयक्तिक कार्यकर्ते नाही.”
“जनतेच्या विश्वासाने नवी दिशा निर्माण कराण्यासाठी प्रगती, शिक्षण आणि रोजगाराचे स्वप्न साकारायचं आहे” तसेच आपल्या हक्कासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे रेशमाताई शिंदे यांनी सांगतात.
जिल्हा परिषद गटात सतत काम केल्यामुळे आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी राहिल्यामुळे जयेश शिंदे यांची जनतेशी घट्ट नाळ जोडली आहे. या भूमिकेमुळे त्यांचे पारडे राजकीय प्रतिस्पर्ध्यांसाठी जड झालेले दिसत आहे.