उरुळी कांचन ग्रामपंचायतीतील विद्यमान सदस्य शंकर उत्तम बडेकर हे गेल्या काही वर्षांपासून विकास आणि लोकसेवेचा वसा घेऊन कार्यरत आहेत. कोणताही राजकीय वारसा नसतानाही केवळ जनतेच्या आशीर्वादावर आणि आपल्या प्रामाणिक कामाच्या बळावर त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपद पटकावले.आपल्या कार्यकाळात बडेकर यांनी ग्रामविकासाला गती देणारी अनेक कामे पूर्णत्वास नेली. वर्षानुवर्षे रखडलेले रस्ते पूर्ण करून नागरिकांना सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली. पाणीपुरवठा, वीज आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करत गावातील प्रत्येक घरापर्यंत सुविधा पोहोचविल्या. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहिमा राबवून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभी केली. महिला वर्गाला दररोज पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला.कोविड काळात शंकर बडेकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक गरजू नागरिकांना मदत केली. रुग्णालयांमध्ये जाऊन गरीब रुग्णांच्या उपचारांचा खर्च कमी करून देण्याचे कार्य त्यांनी केले. या काळात त्यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांना “जनतेचा आधारस्तंभ” म्हणून ओळख दिली.
सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देण्यासाठी बडेकर यांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणत सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंती साजरी करण्याची परंपरा सुरु केली. शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभाव, तसेच प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे ग्रामस्थांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.
आता उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांच्या अपेक्षेनुसार शंकर उत्तम बडेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य (उरुळी कांचन गट) या पदासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
“जनतेने मला जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून दिल्यास, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा आणि सर्वसमावेशक विकास व्हावा हेच माझे ध्येय असेल.”असे शंकर उत्तम बडेकर सांगतात
जनतेच्या सेवेला समर्पित आणि विकासाचा ध्यास घेतलेले शंकर उत्तम बडेकर आज उरुळी कांचन परिसरातील जनतेच्या मनात एक विश्वासू लोकसेवक म्हणून आपले स्थान निर्माण करत आहेत.