हवेली तालुक्यातील पेरणे पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी सांडस येथील वंदना राजू वारघडे यांच्या नावाची पंचायत समिती गटात जोरदार चर्चा सुरू आहे.त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. त्यांच्या उमेदवारीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतआहे ,त्यांचे पती राजू वारघडे यांचे सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामपातळीवरील नेतृत्वाशी उत्तम संबंध असल्याने या उमेदवारीला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.
राजू वारघडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी कोणत्याही पक्षभेदाशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या लोकसंपर्काचा फायदा आता वंदना वारघडे यांच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे बोलले जात आहे.राजू वारघडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यातून सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षभेदाशिवाय त्यांना सर्वत्र पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी सांडस, बकोरी, पेरणे, डोंगरगाव, वढू खुर्द आणि बुरकेगाव या गावांमध्ये वारघडे कुटुंबाचा प्रभाव असून, त्यांनी विविध शासकीय योजना, आरोग्य सहाय्य आणि ग्रामविकासाच्या कामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर वंदना वारघडे यांच्या उमेदवारीकडे महिला आणि युवक वर्गाचा कल झुकताना दिसत आहे.
दरम्यान, त्यांच्या प्रचाराची तयारीही जोरात सुरू असून महिलांचा विशेष उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. युवक वर्गातही त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत वंदना वारघडे या एक प्रभावी आणि सक्षम उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.