राजकारण म्हणजे सत्ता नव्हे, सेवा हेच खरं ध्येय!” ही भूमिका जपणाऱ्या आणि कार्यातून गावाचा चेहरा बदलणाऱ्या उपसरपंच सौ. मालती गणेश गोगावले या आज वाघोली-खराडी परिसरातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
मांजरी येथील तुपे घराण्यात जन्मलेल्या मालतीताईंचा प्रवास हा साध्या कुटुंबातील कन्येपासून जनसेवेच्या कार्यश्रीमंत व्यक्तिमत्त्वापर्यंतचा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही लोकसेवा आणि विकासाची ओढ त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन आली. २००५ साली त्यांचा विवाह वाघोलीतील प्रगतीशील युवा उद्योजक गणेश गोगावले यांच्याशी झाला आणि त्या प्रतिष्ठित गोगावले परिवारात आल्या. कुटुंबाचा सामाजिक विचार आणि सार्वजनिक जीवनातील सहभाग याचा वारसा त्यांनी अंगीकारला. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती गणेश गोगावले आणि छोटे दीर युवा उद्योजक नवनाथ गोगावले यांची भक्कम साथ लाभली आहे.
२०१७ साली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आल्यापासूनच मालतीताईंनी “काम बोलतंय” ही ओळख निर्माण केली. पद मिळवणं हेच ध्येय न ठेवता त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली. त्यांच्या कार्यकाळात वाघोलीमध्ये पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारणा, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, महामार्गावरील व वस्तीतील पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, आठवडे बाजार, क्रीडांगण, बगीचा आणि बसथांबे उभारणी अशा अनेक मूलभूत सुविधांना वेग आला. कोरोना काळात त्या खंबीरपणे लोकांसोबत उभ्या राहिल्या — रेशन किट वाटप, सॅनिटायझेशन मोहीम, उत्तर भारतीय बांधवांना गावी पोहोचविण्याची व्यवस्था आणि ड्रेनेज कामे या सगळ्या उपक्रमांत त्यांनी स्वतःचा वेळ आणि श्रम झोकून दिले.
२०२१ साली वाघोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच विकासाची नवी दिशा — उपसरपंच सौ. मालतीताई गणेश गोगावलेनिवडणुकीत ग्रामविकास पॅनेलच्या मालती गोगावले यांनी विजयी झाल्या. हा विजय म्हणजे ग्रामस्थांच्या विश्वासाचा परिपाक होता.
मालतीताईंच्या कार्यात महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष स्थान आहे. त्यांनी स्वयं-साहाय्यता गटांना चालना देत मोफत चारचाकी वाहन प्रशिक्षण, ब्यूटी पार्लर आणि शिवणकाम कोर्सेस राबवले. युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून पी.एम.सी. हॉस्पिटलसारख्या उपक्रमांना त्यांनी पुढाकार दिला.
त्यांच्या मते “विकास म्हणजे फक्त विटा-सिमेंट नव्हे; तो समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीचा प्रवास आहे.” त्यामुळेच त्यांनी ठरवलंय — खराडी-वाघोलीला स्मार्ट, हरित, सुरक्षित आणि डिजिटल शहर बनवायचं. प्रत्येक वस्तीपर्यंत गटार, रस्ता, लाईट सुविधा पोहोचवणे, प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणे, युवकांना डिजिटल जगाशी जोडून आत्मनिर्भर बनवणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे — हेच त्यांचं ध्येय आहे.
मालतीताई नेहमी सांगतात, “आपण दिलेलं मत म्हणजे माझ्यासाठी बहिणीचं, आईचं, भावाचं, लेकराचं प्रेम आणि विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही — हे माझं प्रामाणिक वचन आहे.” त्यांच्या कार्यपद्धतीत प्रामाणिकता, पारदर्शकता आणि लोकसहभाग हेच तीन स्तंभ आहेत.
सौ. मालती गणेश गोगावले यांचा प्रवास हा एक प्रेरणादायी उदाहरण आहे की सेवेच्या भावनेने आणि निष्ठेने काम केल्यास सामान्य स्त्रीसुद्धा समाजपरिवर्तनाची धुरा वाहू शकते. त्यांच्या नेतृत्वात खराडी-वाघोली “प्रगतीच्या वाटेवर” पुढे चालली आहे — आणि गावात पुन्हा एकदा तोच आवाज घुमतोय “काम बोलतंय… आणि खराडी-वाघोली पुढे चाललीय प्रगतीच्या वाटेवर!”