Home » राजकारण » ‘आशीर्वाद यात्रा’पासून स्वयंरोजगार शिबिरापर्यंत – प्रदीप भाऊ कंदांचा सर्वसमावेशक विकास मार्ग

‘आशीर्वाद यात्रा’पासून स्वयंरोजगार शिबिरापर्यंत – प्रदीप भाऊ कंदांचा सर्वसमावेशक विकास मार्ग

Facebook
Twitter
WhatsApp
94 Views
  • लोणीकंद–पेरणे गटात प्रदीप भाऊ कंद यांची जनसंपर्कात आघाडी; ‘आशीर्वाद यात्रा’, स्वयंरोजगार शिबिरे आणि समाजकार्याच्या माध्यमातून वाढतं जनाधार.
  • सेवाभाव, अध्यात्म आणि विकास यांचा संगम साधत प्रदीप वसंत (भाऊ) कंद ठरत आहेत लोणीकंद–पेरणे गटातील जनतेचा विश्वासाचा केंद्रबिंदू.
  • ‘एक हात मदतीचा’ ते ‘आशीर्वाद यात्रा’ – समाजसेवा आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून प्रदीप भाऊ कंद निर्माण करत आहेत नव्या नेतृत्वाची ओळख.
  •  लोणीकंद–पेरणे गटात कंद नावाचं वलय अधिक दृढ; प्रदीप भाऊंच्या नेतृत्वाखाली सामाजिक व धार्मिक उपक्रमांना नवा उत्साह.
  • . अध्यात्मिक जाण, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचा ध्यास – प्रदीप भाऊ कंद बनलेत जनतेच्या आशा-अपेक्षांचं प्रतीक.
हवेली तालुक्यातील लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. या गटात प्रदीप वसंत (भाऊ) कंद यांनी प्रभावी मोर्चेबांधणी सुरू केली असून, आपल्या कार्यशैलीतून आणि लोकसंपर्कातून त्यांनी परिसरात वेगळं वलय निर्माण केलं आहे. सध्या मतदारसंघात प्रदीप भाऊंनी स्पष्ट आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांत प्रदीप भाऊंनी ‘अयोध्या–काशी आशीर्वाद यात्रा’ आयोजित करून गटातील नागरिकांना अध्यात्मिक अनुभव दिला. या यात्रेमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यात्रेच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि धार्मिक एकतेचा संदेश त्यांनी दिला. या उपक्रमानंतर संपूर्ण गटात प्रदीप भाऊंच्या कार्यशैलीची चर्चा रंगू लागली आहे.
फक्त अध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि विकासात्मक कामातही प्रदीप भाऊ आघाडीवर दिसतात. मंदिरांची दुरुस्ती, वीज ट्रान्सफॉर्मर बसवणे, डीपी बदलणे, रस्त्यांची सुधारणा, तसेच नागरी अडचणी सोडवणे — अशा प्रत्येक क्षेत्रात ते तत्परतेने काम करतात. “प्रदीप भाऊंना सांगितलं की काम होतं” ही भावना आता लोकांच्या मनात घट्ट बसली आहे.
सेवाभावातून प्रेरित होऊन त्यांनी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्तांना मदतकार्य राबवलं. तसेच लोणीकंद–पेरणे गटातील गरजू युवक-युवतींसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आयोजित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. समाजातील तरुणांना सक्षम करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अध्यात्मिक ओढ निर्माण व्हावी, यासाठी त्यांच्या पुढाकारातून “आरंभ भजन स्पर्धा” आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनातून भाविकांना सुश्राव्य भक्तीगीतांची पर्वणी लाभणार आहे. अध्यात्म आणि संस्कार यांचं मिश्रण असलेले असे उपक्रम प्रदीप भाऊंच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाचं प्रतीक मानले जातात.
विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य म्हणून प्रदीप भाऊ कंद यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ठामपणे मांडल्या आहेत. विजेचा अपुरा पुरवठा, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आणि सिंचनाच्या अडचणी याकडे त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. या कामामुळे ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता वाढली आहे.
सामाजिक सलोखा आणि ऐक्य वाढवण्यासाठी त्यांनी लोणीकंद परिसरात दिवाळी स्नेह समारंभाचे आयोजन केलं. नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी या निमित्ताने केलं.
आज लोणीकंद–पेरणे गटात “कंद” या नावाचं राजकीय आणि सामाजिक वलय तयार झालं आहे. त्याचा नैसर्गिक फायदा प्रदीप भाऊंना होत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. समाजकारण, अध्यात्म आणि विकास यांचा संगम साधणारा प्रदीप भाऊ कंद हा या गटातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून झळकू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!