Home » गुन्हा » मांत्रिकाने 14 कोटी लुबाडल्याचा आरोप; अंधश्रद्धेच्या जाळ्यात पुण्यातील आयटी इंजिनिअर

मांत्रिकाने 14 कोटी लुबाडल्याचा आरोप; अंधश्रद्धेच्या जाळ्यात पुण्यातील आयटी इंजिनिअर

Facebook
Twitter
WhatsApp
46 Views

मांत्रिकाने 14 कोटी लुबाडल्याचा आरोप; अंधश्रद्धेच्या जाळ्यात पुण्यातील आयटी इंजिनिअर

 

पुण्यातील एक उच्चशिक्षित आणि इंग्लंडहून परतलेले दांपत्य भोंदूबाबाच्या नादी लागले. त्यामुळे त्यांना तब्बल 14 कोटींचे नुकसान सोसावे लागले. तसेच मानसिक त्रास देखील सहन करावा लागला.

संबंधित दांपत्याच्या मुली या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना बरे करुन देतो असे सांगून त्यांना लुबाडण्यात आले.

इंग्लंडमध्ये 12 वर्ष राहिलेलं आणि आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम केलेलं हे दांपत्य आपल्या दोन विकलांग मुलींच्या उपचारासाठी ‘माऊली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदिका पंढरपूरकर आणि भोंदूबाबा दीपक खडकेच्या नादी लागलं.

अंगात एक महाराज संचारतात असा दावा करत वेदिका पंढरपूरकरने मुलींचे आजार बरे करण्याचं आश्वासन दिले आणि त्यासाठी तब्बल 14 कोटी रुपये उकळले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून सखोल चौकशी सुरू आहे.

आरोपी वेदिका पंढरपूरकर आणि दीपक खडके यांची बाजू जाणून घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. आरोपी आणि त्यांचे साथीदार सध्या फरार असल्यामुळे त्यांची बाजू मिळू शकली नाही. ती आल्यानंतर अपडेट करण्यात येईल.

‘आयुष्यभराची कमाई गेली’

पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भजनी मंडळात या दांपत्याची कुटुंबीय आणि मांत्रिक दीपक खडके यांची ओळख झाली. खडके याने कुटुंबाची ओळख वेदिका पंढरपूरकरशी करून दिली. मुलींचे आजारपण आपण कायमचे दूर करू शकतो असा विश्वास त्यांनी संबंधित कुटुंबीयांना दिला.

Adv. Vijay Thombreभोंदूबाबा दीपक खडके आणि महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकर

‘माझ्या अंगात एक महाराज संचारतात त्यामुळे मी मुलींचा आजार बरा करू शकते,’ असे वेदिका पंढरपूरकरने सांगितले.

उपचारासाठी पैसे लागतील असे कळल्यानंतर हे पैसे उभे करण्यासाठी पीडित कुटुंबीयांना आपली सर्व मालमत्ता विकावी लागली. इंग्लंडमध्ये असलेले घर देखील त्यांना विकावे लागले. यातून त्यांनी पैसे उभे केले. ते पंढरपूरकर आणि खडकेंनी उकळल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

‘आरोपींनी विकत घेतला बंगला’

संबंधित कुटुंबीयांचे यांचे वकील अ‍ॅड. विजय ठोंबरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, इंग्लंडमधील आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणारे एक आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी 2018 मध्ये आपल्या दोन विकलांग मुलींच्या संगोपनासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

या दांपत्याकडून मिळालेली रक्कम वेदिकाने स्वतःच्या खात्यात वळवून घेतली आणि कोथरूडमधील एका सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला.

Getty Imagesप्रतीकात्मक छायाचित्र

मांत्रिकांवर विश्वास ठेवून या दांपत्याने एकेक करून सर्व मालमत्ता त्यांच्या खात्यात वर्ग केली आणि आपलं सर्वस्व गमावलं.

पहिल्यांदा बँक खात्यातील रक्कम, एलआयसी, म्युच्युअल फंड, प्रॉव्हिडंट फंडमधील पैसे वेदिकाच्या खात्यावर वळवले.

नंतर इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून मिळालेली रक्कमही तिच्या ताब्यात घेतली.

त्यानंतर पुण्यातील फ्लॅट्स, गावाकडचं घर आणि शेतजमीन विकून ते पैसे कुटुंबाने मांत्रिकांच्या नावावर केले.

शेवटी राहत्या घरावर लोन घेऊन या कुटुंबाने ते पैसे मांत्रिकांना दिले.

या कुटुंबीयांनी RTGS द्वारे केलेल्या सर्व व्यवहारांचे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. आज हे दांपत्य आपल्या दोन मुलींसह भाड्याच्या घरात राहते आणि उपचारासाठी पैशांचीही गरज आहे, असे कुटुंबीयांच्या वकिलांनी सांगितले.

Adv. Vijay Thombreभोंदूबाबा दीपक खडके

“मुलींवरील प्रेमापोटी आम्ही विश्वास ठेवला, पण ज्यांना माऊली म्हटलं त्यांनीच घात केला,” असं पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे.

अ‍ॅड. ठोंबरे पुढे म्हणाले, “मुलींचा दुर्धर आजार कायमचा बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबा दीपक खडके, मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा पती कुणाल, तिची आई आणि भाऊ अशा चार-पाच जणांनी मिळून माझ्या पक्षकाराची तब्बल 14 कोटींनी फसवणूक केली आहे. इतकं करुनही मुलींच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं लक्षात आल्याने अखेर माझ्या पक्षकारांनी पोलिसांत धाव घेतली.

“3 नोव्हेंबरला माझ्या पक्षकारांनी तक्रार दाखल केली, सध्या पोलीस तपास सुरू आहे. मात्र, त्यानंतर मांत्रिक महिलेच्या काही भक्तांकडून संबंधित कुटुंबीयांनी तक्रार मागे घेण्याबाबत धमकावलं जात आहे. या दांपत्याच्या दोन्ही मुलींना उपचाराची गरज असून सदर रक्कम त्यांना परत मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे ठोंबरे यांनी सांगितले.

Source by (बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

पुण्यात उच्चशिक्षित दांपत्याची फसवणूक Adv. Vijay Thombare

source: bbc.com/marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!