विश्व हिंदू आयोजित, बजरंग दल, कर्वेनगर प्रखंड आयोजित, भव्य रक्तदान शिबीर
पुणे (प्रतिनिधी)ः श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात भविष्यात श्रीरामांचे भव्य असे मंदिर व्हावे ही इच्छा ठेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या कारसेवकांच्या, हुतात्मे कोठारी बंधुंच्या स्मरणार्थ दरवर्षी बजरंग दलाच्या वतीने देशभर रक्तदान शिबीर राबविले जाते.
आपल्या कर्वेनगर परिसरातील सर्व हिंदू समाजाने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून रक्तदान करण्यासाठी यावे असे, आव्हान करण्यात आले होते, त्यास कर्वेनगर प्रखंड परिसरातील धार्मिक, राजकीय, सामाजिक संघटना व कार्यकर्ते असे सर्व एकुण २२५ जणांनी उपस्थिती लावली…
सदर उपक्रमांत ३९ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले योगदान दिले…. तसेच *श्रीराम मंदिर* उभारणीमध्ये *कारसेवा* बजावणाऱ्या जेष्ठ कारसेवाकांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. अक्षय ब्लड बँक सेंटर, हडपसर यांचे सहकार्य मिळाले. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सुस्वाद कॅन्टीन हॉल व स्टाफ यांचे सहकार्य मिळाले.


सदर कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, प्रांत आयाम प्रमुख, प्रांत मातृशक्ती, दुर्गा वाहिनी,, विभाग मंत्री, सहमंत्री, भाग मंत्री, सहमंत्री, बजरंग दल संयोजक, सहसंयोजक, प्रखंड पालक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्वेनगर प्रखंडातील श्री. मयूरजी बनकर, श्री. राहुलजी विभुते, श्री. आनंदजी खरात, श्री. यज्ञेशजी वाणी, महेश बनकर, आकाश बांगरे, नरेश धोटे, रविंद्र सोनवणे, आदित्य भालेराव, कृष्णा डुच्चे यांचे विशेष योगदान लाभले.





