Home » ताज्या बातम्या » बालगंधर्व रंगमंचावर मातोश्रींचा सन्मान हाच आम्हां कलाकारांचा अभिमान..

बालगंधर्व रंगमंचावर मातोश्रींचा सन्मान हाच आम्हां कलाकारांचा अभिमान..

Facebook
Twitter
WhatsApp
282 Views

बालगंधर्व रंगमंचावर मातोश्रींचा सन्मान हाच आम्हां कलाकारांचा अभिमान..

पुणे (प्रतिनिधी ) : बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य , पुणे आयोजित , मराठी रंगभुमी दिनानिमित्तानं कलाकार माता – पिता कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा २०२५ ” पार पडला . या सोहळ्या मध्ये प्रसिद्ध उमेश जोशी गुरूजी हे  ज्योतिष वास्तू तज्ञ , गायक , नृत्य कलाकार , लेखक असून परेश जगदीगश जोशी ( थोरले बंधू  ) , जागृती गो.गादिया ( थोरली बहिण ) गायिका – कलाकार , यांच्या मातोश्री असून सुरेखा उमेश जोशी कलाकार व इवेंन्ट आयोजिका यांची सासूबाईं , तिसरी पिढी प्रद्युम व पद्मिनी उमेश जोशी ( नातू व नात ) बालकलाकार व शिवगर्जनाकार यांची लाडकी आजी  वर्षे ६५ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार , संगीतकार , गायिका , लेखिका श्रीमती ज्योत्स्ना ऊर्फ शामला जगदीश जोशी यांचा मा.सौ.तृप्तीताईं देसाई ( भूमाता बिग्रेड संस्थापिका ) , आदरणीय जगदगुरूकृपांकित डाॕ.चेतनानंदजी महाराज संस्थाक – जगदगुरू श्री तुकोबाराय विश्व कल्याण मिशन ( अयोध्या येथे रामलल्ला गर्भगृहात कीर्तन  करणारे एकमेव कीर्तनककार ) , आयोजक मा.श्री.मेघराजजी राजेभोसले ( अध्यक्ष – बालगंधर्व परिवार ट्रस्ट ) , सौ.हेमलता वहिनींसाहेब राजेभोसले , या मान्यवरांच्या शुभहस्ते थाटामाठात सन्मान देऊन पुरस्कार देण्यात आला…

हा जोशी परिवारातील कलाक्षेत्रातील योगदानाचा उल्लेखनीय  अभिमानास्पद क्षण आहे..

बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य पुणे , आयोजक व सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी तसेच ” कृतज्ञता कलाकार माता- पिता सन्मान” ही संकल्पना सुप्रसिद्ध निवेदक , गायक , अभिनेता मा.श्री.चित्रसेनजी भवर सरांनी राबवली आहे तसेच सुत्रसंचालन पण सुंदर केले आणि श्री व सौ. भवर यांनी सुमधूर गीत सादर करून प्रक्षेकांची मने जिंकली , रसिक प्रेक्षक अगदी मनलाऊन कार्यक्रम बघत होते  आणि आमच्या मातोश्रींचे ह्या सोहळ्यात सन्मानसाठी नाव सुप्रसिद्ध निवेदिका – सौ.शोभाताईं कुलकर्णी यांनी सुचविले होते , या सुंदर कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक , नातेवाईक , मित्रपरिवार , यांची प्रचंड गर्दी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!