Home » मनोरंजन » लहानग्यांसाठी योगेश झुरुंगे यांच्याकडून विशेष सहलीचे आयोजन

लहानग्यांसाठी योगेश झुरुंगे यांच्याकडून विशेष सहलीचे आयोजन

Facebook
Twitter
WhatsApp
93 Views
लहानग्यांसाठी योगेश झुरुंगे यांच्याकडून विशेष सहलीचे आयोजन

लोणीकंद–पेरणे परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्साह, उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक

लोणीकंद–पेरणे परिसरातील मुलांसाठी ही ‘आनंदसफर’ ठरली अविस्मरणीय!

लोणीकंद प्रतिनिधी:
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील बुर्केगाव येथून लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी खास ‘विशेष सहल’ आयोजित करण्यात आली. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय (सर्पोद्यान) येथे हि सहल जाणार असून या सहलीत मुलांना निसर्ग, प्राणीविश्व आणि पर्यावरणाची प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.सामाजिक, धार्मिक आणि जनसंपर्काच्या कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या योगेश झुरुंगे यांच्या संकल्पनेतून ही सहल आयोजित करण्यात आली होती. योगेश भाऊ झुरुंगे मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुलांनी विविध प्राण्यांचे निरीक्षण करून आनंद व्यक्त केला आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या सहलीचा शुभारंभ माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे, माजी चेअरमन बाळासाहेब ठोंबरे, बैलगाडा मालक शंकर ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बाजारे, भिवाजी शिंगटे, जयसिंग ठोंबरे, बबन जांभळकर, गणेश पोकळे व विक्रम ठोंबरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या सहलीच्या यशस्वी नियोजनात भाऊसाहेब ठोंबरे, किरण सोनवणे, भिमा ठोंबरे आणि सागर झुरुंगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
एकीकडे देवदर्शन यात्रांचे आयोजन साधारणतः मतदारसंघांवर लक्ष ठेवून केले जाते, मात्र लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.“जनतेच्या सेवेसोबतच लहानग्यांमध्ये सामाजिक जाणीव व आनंद निर्माण करावा, या हेतूने ही सहल राबविण्यात आली,” असे  झुरुंगे यांनी सांगितले. “मुलांचा उत्साह पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. येत्या काळात आणखी ८ ते १० अशा सहलींचे नियोजन सुरू असून, नागरिकांच्या सूचनेनुसार या उपक्रमांची व्याप्ती वाढविणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!