लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार व लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या तुळजापूर–अक्कलकोट–पंढरपूर देवदर्शन यात्रेला शेकडो भाविकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मायबाप जनतेसाठी श्रद्धा, सेवा आणि सुविधा या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधणारी ही यात्रा नागरिकांसाठी खास ठरली.यात्रेच्या सुरुवातीला लोणीकंद येथे सर्व भाविकांसाठी चहा–नाश्ता यांची उत्तम सोय करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या उत्साहात बस तुळजापूरकडे रवाना झाली. यात्रेला मार्गस्थ करण्यासाठी आणि भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी योगेश झुरुंगे यांच्यासह सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजेश झुरुंगे, कुंडलिक झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, राजू वाघुले, अजित कोहिनकर, भारत झुरुंगे, हर्ष वानखेडे, नाना देवकर, भाऊसाहेब ठोंबरे, भीमा ठोंबरे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविक प्रथम तुळजापूर येथे आई अंबाबाईचे दर्शन, त्यानंतर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार असून रात्रीचा मुक्काम अक्कलकोट येथे आहे. सकाळी नाश्त्यानंतर यात्रा पंढरपूरकडे विठ्ठल–रुक्मिणीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होणार असून दुपारी दर्शन घेत परतीचा प्रवास होणार आहे.
याचबरोबर, लोणीकंद–पेरणे गटातील जनतेसाठी झुरुंगे यांनी नागपूर दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे जाणारी तीर्थयात्राही याच आठवड्यात आयोजित केली. शुक्रवारी रात्रीच शेकडो भाविकांची बस नागपूरकडे रवाना झाली असून चहा, नाश्ता, जेवण आणि राहण्याची सर्व सोय आयोजकांकडून व्यवस्थित करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत योगेश झुरुंगे यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवून लोकांमध्ये सातत्याने संपर्क वाढवला आहे. त्यांच्या या उपक्रमांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता नागरिकांमध्ये झुरुंगे यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. “योगेश भाऊ लोकांसाठी प्रयत्न करतात, सोय करतात आणि स्वतः पुढे राहून व्यवस्था पाहतात. म्हणूनच या यात्रांना एवढा प्रतिसाद मिळतो.” अशी भावना यात्रेतील नागरिकांनी व्यक्त केली
एकूणच, झुरुंगे यांच्या उपक्रमांमुळे लोणीकंद–पेरणे गटात त्यांची लोकप्रियता वाढत असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याभोवती सकारात्मक चर्चा सुरू आहे.