Home » ब्लॉग » आशीर्वाद यात्रा , तिसरा टप्पा अयोध्या व काशी कडे प्रस्थान

आशीर्वाद यात्रा , तिसरा टप्पा अयोध्या व काशी कडे प्रस्थान

Facebook
Twitter
WhatsApp
175 Views
  • आशीर्वाद यात्रा , तिसरा टप्पा अयोध्या व काशी कडे प्रस्थान,
  • फुलगावकरांचे भावनिक साकडे : “प्रदीप भाऊ कंदांच्या विजयासाठी, काशी विश्वेश्वराची कृपा कायम राहो!”
लोणिकंद, प्रतिनिधी
आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आज भक्तिभावात अयोध्या–काशीच्या दिशेने प्रस्थान करताच, परिसरातील गावातून प्रदीप भाऊ कंद यांच्या विजयासाठी एकच आवाज घुमला “काशी विश्वेश्वर आमच्या प्रदीप भाऊंच्या पाठीशी राहो!”
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप वसंत कंद यांच्या पुढाकारातून सुरू झालेली आशीर्वाद यात्रा आता जनआस्थेचा, भक्तीचा आणि सेवाभावाचा एक भव्य उत्सव बनत चालली आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये हजारो भाविकांना अयोध्या काशी देवदर्शन घडवत त्यांच्या श्रद्धेला नवा आधार देणाऱ्या प्रदीप भाऊ कंद यांच्या विषयी नागरिकांमध्ये अपार कृतज्ञता आणि भावनिक ओढ निर्माण झाली आहे.
राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि गावोगावच्या भाविकांच्या कल्याणासाठी साकडे घालत प्रदीप भाऊ कंद यांनी मागील टप्प्यात गंगेच्या प्रवाहात दिवा अर्पण करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मनोभावे प्रार्थना केली होती. या सेवाभावाच्या आणि दायित्वाच्या भावनेने प्रेरित होऊन आता फुलगावकरांनीही प्रदीप भाऊंच्या राजकीय विजयासाठी काशी विश्वेश्वराच्या चरणी साकडे घालण्याचा संकल्प केला आहे.
यात्रेच्या प्रस्थानावेळी नागरिकांनी रामनामाचा जयघोष करत प्रदीप भाऊ कंदांना शुभाशीर्वाद दिले. “प्रदीप भाऊंच्या सेवेमुळे आमच्या गावातील प्रत्येक कुटुंब जोडले गेले. आज आम्ही आमच्या मनातील साकडे काशी विश्वेश्वराला अर्पण करण्यासाठी निघत आहोत,” अशी भावना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
या यात्रेत भाविकांना काशी विश्वेश्वर, श्रीराम जन्मभूमी मंदिर, हनुमानगढी, सरयू स्नान आणि पवित्र गंगा आरतीचा दिव्य अनुभव मिळणार असून, प्रदीप भाऊ कंद यांच्या सुव्यवस्थित नियोजनामुळे यात्रेच्या प्रत्येक टप्प्यात भक्तिभाव, सुरक्षितता आणि उत्कृष्ट व्यवस्थेची पातळी अधिक उंचावत आहे.
आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा भक्ती, श्रद्धा आणि प्रदीप भाऊ कंद यांच्यावरील जनविश्वासाचा भक्कम पुरावा ठरत असून, फुलगावकरांचा साकडा आता काशी विश्वेश्वराच्या गाभाऱ्यात पोहोचणार आहे.
प्रदीप भाऊ कंदांच्या विजयासाठी उठलेले हजारो हात, आणि काशीच्या दिशेने निघालेले भक्तीपूर्ण पाऊल आहे,ही आशीर्वाद यात्रा आता जनआस्थेचा उत्सव बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!