Home » ब्लॉग » लोणीकंद–पेरणे ZP गटात निवडणुकीत रंगत भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम—‘कोणाचा झेंडा हाती घेऊ?’

लोणीकंद–पेरणे ZP गटात निवडणुकीत रंगत भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम—‘कोणाचा झेंडा हाती घेऊ?’

Facebook
Twitter
WhatsApp
412 Views
  • लोणीकंद–पेरणे ZP गटात निवडणुकीत रंगत
  • भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम‘कोणाचा झेंडा हाती घेऊ?’

लोणिंकंद/प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीकडून प्रदीप भाऊ कंद विरुद्ध भाजपचे किरण साकोरे अशी थेट लढत होईल, अशी चर्चा होती. मात्र आता दिग्विजय भोंडवे यांनी उमेदवारीची घोषणा करताच या गटातील राजकीय समीकरणात अचानक मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष व क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदिप आप्पा भोंडवे यांचे चिरंजीव पैलवान दिग्विजय भोंडवे यांनी सोशल मीडियावर उमेदवारीची इच्छा जाहीर केली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
यापूर्वी भाजपकडून किरण साकोरे यांच्या नावाचीच जोरदार चर्चा होती. मात्र आता दिग्विजय भोंडवे यांनीही भाजपकडून इच्छुक असल्याचे स्पष्ट केल्याने, भाजपचे तिकीट पैलवान किरण साकोरे यांना मिळणार की पैलवान दिग्विजय भोंडवे यांना? हा निर्णायक प्रश्न कार्यकर्त्यांसह स्थानिक राजकारणात चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.
 संदीप आप्पा भोंडवे यांचे पक्षाशी असलेले वैयक्तिक व संघटनात्मक संबंध पाहता, ते आपल्या चिरंजीवांच्या नावासाठी प्रभाव टाकू शकतात, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जोरात आहे. त्यामुळे तिकिटासाठी भोंडवे यांचे पारडे जड ठरू शकते, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.“नेमका कोणाचा झेंडा हाती घेऊ?” असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडू लागला आहे.
दरम्यान, परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष प्रदीप दादा कंद नेमकी कोणती भूमिका घेतात, ते कोणत्या पैलवानाला झुकते माप देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
एकूणच, लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील निवडणूक समीकरणे झपाट्याने बदलू लागली असून, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे स्थानिक राजकारणात प्रचंड उत्सुकता, चर्चा आणि गडबडगोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!