Home » ताज्या बातम्या » ‘गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाली तर संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे थेट निलंबन! मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मोठा इशारा.

‘गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाली तर संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे थेट निलंबन! मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मोठा इशारा.

Facebook
Twitter
WhatsApp
65 Views

‘गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाली तर संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे थेट निलंबन! मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मोठा इशारा.

 

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे.

यापुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला .

अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनास आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले. Advertisement

या अंतर्गत सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

सह आयुक्त (अन्न), सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची तपासणी करावी. तसेच त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी व प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बंदीबाबत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!