Home » राजकारण » ‘राज ठाकरेंची तुलना अमित शाहांशी करु नका’, संजय राऊत पत्रकार परिषदेत संतापले, नेमकं काय झालं?

‘राज ठाकरेंची तुलना अमित शाहांशी करु नका’, संजय राऊत पत्रकार परिषदेत संतापले, नेमकं काय झालं?

Facebook
Twitter
WhatsApp
63 Views

‘राज ठाकरेंची तुलना अमित शाहांशी करु नका’, संजय राऊत पत्रकार परिषदेत संतापले, नेमकं काय झालं?

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तुलना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी करु नये असं म्हटलं आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना सत्तावाटपाचा फॉर्म्युला काही ठरला आहे का? यासंदर्भात प्रश्न विचारताना 2018 चा उल्लेख करण्यात आला. यानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत अमित शाह बेईमान होते अशी टीका केली.

“तुम्ही अपमान करत आहात. राज ठाकरेंची तुलना अमित शाह यांच्याशी करु नका. तेव्हा त्यांनी बेईमान केली. त्यांनी शब्द पाळला नाही. ते बेईमान आहेत. तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं चुकीचं आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

‘भाजपा किंवा फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं?’

“‘भाजपा किंवा फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? गोपीनाथ मुंडे सोडले तर कोणीही कधीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत. बेळगाव कारवार सीमेवर मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही. बाकी मला संगा कोणत्या भाजपा नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या आत्याचाविरोधात आवाज उठवला. ना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ना त्यांच्या सहकाऱ्यांनी,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

“बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करु, महाराष्ट्र तोडू. त्याच्याविरोधात ठाकरेच उभे राहिले ना. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जाब विचारण्याचं त्यांचं कर्तव्य होतं. तुम्ही आम्हाला काय मराठी माणसाच्या गोष्टी शिकवता. बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. अन्यथा राज्याचा तुकडा पाहून, एका लहान तुकड्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही, आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रात आम्ही अजूनपर्यंत संघर्ष करुन ठेवलं आहे ही तुमची पोटदुखी आहे. तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? 10 कामं दाखवा,” असं आव्हान संजय राऊतांनी दिलं.

‘तुम्ही काय एकमेकांना चंपी मालिश करायला एकत्र आला आहात’

“गौतम अदानीसारख्या मोदींच्या मित्राला मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची सेवा आहे का? आमचे दोन ठाकरे एकत्र आले आहेत, दोन भाऊ, पक्ष एकत्र आले आहेत. तुम्ही तुमचं पाहा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मालिश करायला एकत्र आला आहात. एकनाथ शिंदे रात्री वर्षावर ते फडणवीसांना मालिश करतात. मग फडणवीस ठाण्यात जाऊन आणि मग दोघे मिळून अजित पवारांची मालिश करतात,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

बाळा नांदगावकर नाराज?

‘भाजपा शिंदेंची मुलंही पळवणार आहे’

‘राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा थांबलेली नाही’

“बाळा नांदगावकर आजारी आहेत. मी दोन दिवसांपासून त्याही परिस्थितीत चर्चा करत आहे. मनसे आणि शिवसेनेच्या या संपूर्ण प्रक्रियेत बाळा नांदगावकर दिवस रात्र काम करत होते. रात्री 12, 2 वाजेपर्यंत त्यांच्या शिवसेनेसोबत बैठका सुरु होत्या. ते आजारी असल्याने काल दिसले नाहीत, आजही ते आजारी आहेत,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

आपली मुलं सांभाळावीत म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना उत्तर देताना राऊत म्हणाले, “शिंदेंनीही स्वतची मुलं सांभाळावीत, भाजपा त्यांची मुलंही पळवणार आहे. कुत्रे पकडण्याच्या गाड्यांसारखे पिंजरे भाजपाने लावले आहेत. महापालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवतं ते पाहूयात. शिंदेंची पोरं अनावरस आहेत, ती स्वत:ची पोरं नाहीत. त्यांना मिळालेला पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच अनावरस आहे, अमित शाहांनी हा माझा पक्ष असं आपलं नाव दिलं आहे. महापालिका निवडणुकीनंतर कोणाची पोरं कोण पळवतं हे कळेल. कुत्र्याला लावतात तसे पिंजरे लावतात, त्यात किती जातात ते पाहा”.

‘राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा थांबलेली नाही’

“राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा थांबलेली नाही. मुंबईतल्या जागा किती आहेत त्यावर जागावाटप होईल. कोणाची किती ताकद आहे त्यानुसार वाटप होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत हवे आहेत. मनसे आणि शिवसेनेचे जागावाटप आता संपलं आहे. आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. आकड्यावर युती अडकू नये. जिंकून येणाऱ्या जागांवर चर्चा केली पाहिजे. जर दुसरा उमेदवार जिंकणाार असेल तर जागा सोडली पाहिजे, अडवणूक होऊ नये,” असं मत त्यांनी मांडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!