Home » ब्लॉग » प्रदीप वसंतराव कंद यांनी धरला ‘घड्याळा’चा हात; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

प्रदीप वसंतराव कंद यांनी धरला ‘घड्याळा’चा हात; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
82 Views
लोणीकंद–पेरणे भागात राष्ट्रवादीची ताकद वाढली
एक प्रवेश, संपूर्ण समीकरण बदललं; राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
कंदांचा प्रवेश म्हणजे राजकारणातील टर्निंग पॉइं
📍 पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले आहे. शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या घडामोडीमुळे विद्यमान आमदार माऊली कटके यांची राजकीय ताकद अधिक बळकट झाली आहे. प्रदीप कंद यांची ग्रामीण भागात आधीपासूनच मोठी जनसामान्यात ओळख असून, त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार अधिक विस्तारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या वेळी लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद मतदारसंघातील निरगुडी, वडगाव शिंदे, भावडी, तुळापुर, लोणीकंद, फुलगाव, पेरणे गण, वढु खुर्द, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी-सांडस या गावांतील अनेक सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून, ही सत्ता आगामी काळातही कायम राखण्यासाठी अजित पवार यांनी संघटनात्मक पातळीवर ‘मास्टर प्लॅन’ आखल्याचे स्पष्ट होत आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून हा महत्त्वाचा प्रवेश झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या प्रवेशामुळे ग्रामीण भागातील जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. शेती, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच युवकांच्या रोजगारासाठी विकासाभिमुख नेतृत्वाच्या माध्यमातून एकत्र काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
राजकीय हालचालींना वेग आलेल्या या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत या प्रवेशातून मिळाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!