महाराष्ट्रावर मोठं संकट, अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, हाय अलर्टमुळे खळबळ !
भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भा महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
काही मच्छिमारांनी पाण्यातून निघणारे भयानक बुडबुडे आणि पाण्याच्या मध्यभागी येणाऱ्या जोरदार लाटांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचे पाणी चुलीवरील भांड्यात असलेल्या पाण्यासारखे उकळत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील पालघर ते गुजरात पर्यंतच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समुद्राच्या किनारी भागात पाणी उकळत असल्यामुळे मच्छिमारांसह सरकारचीही चिंता वाढली आहे. अधिकाऱ्यांना पाण्याखालील मोठ्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याची भीती आहे. तसेच हे अज्ञात भूगर्भीय क्रियाकलाप किंवा विषारी वायू गळतीचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे आता पालघर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छिमारांना या क्षेत्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच तज्ञांची एक विशेष टीम या उकळत्या पाण्याची चौकशी करत आहे.
रहस्यमयी बुडबुड्यांमागील खरे सत्य काय?
अरबी समुद्रातील या रहस्यमयी बुडबुड्यांबाबत बोलताना पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी म्हटले की, ‘ही घटना अत्यंत गंभीर आणि असामान्य आहे.’ मच्छिमारांनी पाठवलेल्या व्हिडिओंमध्ये पाण्याचा एक मोठा भाग सतत उकळत असल्याचे दिसून येत आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर अशी घटना सामान्यतः कधीच पहायला मिळत नाही.






