‘पुणे ग्रँड टूर’! पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा रंगणार आहे. या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
सह-पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सायकल स्पर्धा शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तब्बल ४ हजार ३८१ पोलिस कर्मचारी आणि १२ पोलिस उपायुक्तांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून स्पर्धेला सुरुवात होईल आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे समारोप होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत स्पर्धेच्या ७५ ते ९५ किमी लांबीच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. राधा चौक (बाणेर), सूस रस्ता, पाषाण, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, वनाज, नळस्टॉप, टिळक रस्ता आणि अप्पा बळवंत चौक या भागांतून ही शर्यत मार्गक्रमण करेल.
वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्पर्धेच्या मार्गावर कोठेही वाहने उभी करू नयेत. तसेच प्रेक्षकांनी बॅरिकेड्सच्या मागे राहूनच खेळाडूंचा उत्साह वाढवावा. दुपारी १२ ते ४ या वेळेत पाषाण, लॉ कॉलेज रस्ता आणि सातटोटी चौक यांसारखे महत्त्वाचे रस्ते आवश्यकतेनुसार पूर्णपणे बंद ठेवले जातील.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत):राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर – सूस रस्ता)पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शनसेनापती बापट रस्ते ते बालभारतीलॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौककर्वे पुतळा चौक ते वनाज-पौड रस्तानळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकीसेनादत्त चौक ते टिळक चौकटिळक रस्ता ते बाजीराव रस्ताअप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौकराष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौकसावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळमहाराष्ट्र मित्र मंडळ ते सेवन लव्हज चौकसेवन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)घोरपडी जंक्शन परिसर






