Home » ताज्या बातम्या » शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी जमा होणार 22 व्या हप्त्याचे पैसे; तात्काळ पूर्ण करा ही प्रक्रिया!

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी जमा होणार 22 व्या हप्त्याचे पैसे; तात्काळ पूर्ण करा ही प्रक्रिया!

Facebook
Twitter
WhatsApp
19 Views

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी जमा होणार 22 व्या हप्त्याचे पैसे; तात्काळ पूर्ण करा ही प्रक्रिया!

 

तकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक आधार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांत जमा होतात.

सध्या 22 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, केवळ वाट पाहून उपयोग नाही. काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे वेळेत योग्य माहिती घेऊन आवश्यक कामे पूर्ण करणे फार गरजेचे आहे.

 

22 वा हप्ता कधी जमा होणार?

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत नियमित कालावधीत हप्ते देण्यात आले आहेत. साधारणपणे दर चार महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. मागील हप्त्याची तारीख पाहता, पुढील चार महिन्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे. याच आधारे 22 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

ही कामे तात्काळ पूर्ण करा

जर तुम्हाला 22 वा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवायचा असेल, तर काही महत्त्वाच्या प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ई-केवायसी पूर्ण आहे की नाही, हे तपासा. अनेक शेतकऱ्यांचा हप्ता केवळ ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे थांबवला जातो. याशिवाय भू-सत्यापन ही प्रक्रिया देखील महत्त्वाची आहे. यामुळे लाभ घेणारा व्यक्ती खरोखर पात्र शेतकरी आहे की नाही, याची खात्री केली जाते.

मोठी बातमी : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या वाढणार; निवडणूक संपताच भाजप टाकणार नवा डाव

काही राज्यांमध्ये भू-सत्यापन अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन नोंदी यामधील माहिती अचूक आहे की नाही, हेही तपासणे गरजेचे आहे. नावातील स्पेलिंग, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांकात थोडीशी चूक असली तरी हप्ता अडकू शकतो. त्यामुळे अधिकृत पीएम किसान पोर्टलवर किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन आपली सर्व माहिती वेळेत अपडेट करून घ्या, जेणेकरून 22 व्या हप्त्याचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!