Home » ब्लॉग » डॉ. हेडगेवार काँग्रेसचे पदाधिकारी होते.

डॉ. हेडगेवार काँग्रेसचे पदाधिकारी होते.

Facebook
Twitter
WhatsApp
73 Views

डॉ. हेडगेवार काँग्रेसचे पदाधिकारी होते.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळीत एक वर्षाची शिक्षा झाली होती. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला मात्र उद्देश वेगळा होता.

डॉ.केशव बळीराम हेडगेवार हे टिळक अनुयायी होते 1931 पर्यंत ते काँग्रेसचे सभासद होते. त्याकाळी इतर धार्मिक संघटना आणि धर्मनिरपेक्षवादीही काँग्रेसचे सभासद होते.

उदाहरणार्थ लाला लजपतराय ,डॉक्टर मुंजे ,मदन मोहन मालवीय ,आणे, न.चिं.केळकर बॅ. जयकर हे सर्वजण काँग्रेसचे सभासद होते व हिंदू महासभेचेही. त्याचप्रमाणे काँग्रेस मधील मुस्लिम नेते उदाहरणार्थ मौलाना मोहम्मद अली, बॅरिस्टर जिना, डॉक्टर अन्सारी, हकीम अजमल खो हे नेते मुस्लिम लीगच्या व्यासपीठावरही जाऊन बसत.

1934 मध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या लक्षात आल्यावर काँग्रेसच्या सभासदाला कोणत्याही सांप्रदायिक पक्षाचे सभासद होता येणार नाही असा काँग्रेस कार्यकारिणीने ठराव पास करून दुहेरी सभासत्व पद्धत बंद केली.

1930 मध्ये महात्मा गांधीजीने कायदेभंगाची चळवळ सुरू करून स्वतः मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा काढली. डॉक्टर हेडगेवार यांनी सर्व संघ शाखांना सत्याग्रहात भाग घेऊ नये असा आदेश दिला. मात्र ते सत्याग्रहात भाग घेऊन कारागृहात जाण्यांचा हेडगेवारचा उद्देश वेगळा होता.

डॉक्टर हेडगेवार गांधीजीच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेऊन काळा घरात आले ते ब्रिटिशांना विरोध म्हणून कारागृहात आले नव्हते तर त्यांना काँग्रेसच्या नेत्यांना संघात ओढवून काँग्रेस पोखरून काढायची होती.

या सत्याग्रहानंतर म्हणजे 1930 नंतर डॉक्टर हेडगेवार नी संपूर्ण आयुष्यभर ब्रिटिशांच्या विरोधात एकही आंदोलनात किंवा सत्याग्रहात भाग घेतलेला नाही हा आरएसएसचा स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास.

जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस .
हरिभाऊ सोळंके.
सादोळा ता माजलगाव जि बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!