समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने प्रतिकात्मक शेण दान करुन व पुतळ्यांना जोडे मारून अभिनव आंदोलन करण्यात आले.
समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता अलका टॉकीज चौकात सेनापती बापट यांच्या पुतळ्या जवळ असुरक्षित महिला व राष्ट्र पुरुषांच्या बदनामी आणि जेष्ठ इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिल्या बद्दल आंदोलन करण्यात आले.
समाजातील महिला आज सुरक्षित नाहीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय तसेच कुणीही उठतो आणि राष्ट्र पुरुषांच्या बाबत नको ते वक्तव्य करून त्यांचा अपमान करतो आणि जे लेखक इतिहासकार आहेत त्यांना रात्री अपरात्री फोन वरून धमकी देतो.स्वारगेट एस.टी.स्थानकात शिवशाही बसमध्ये फसवून नेऊन बलात्कार करतो अशा निच व बांडगूळ प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.आणि संबंधित गुन्हेगारांना त्वरीत शासन करावे अशी समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने मागणी करण्यात आली.या निच प्रवृत्तीच्या राहुल सोलापूरकरने राष्ट्र पुरुषांची बदनामी केली व प्रशांत कोरटकर सारखा भगोडा फोन वरून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देतो. अशा मानसिक बलात्कार करणाऱ्या आणि दत्ता गाडे सारख्या दळभद्री प्रवृत्तीचे लोक शारीरिक बलात्कार करतात यांना कडक शासन झालं पाहिजे.
तसेच महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा करणारे गृहमंत्री व बेताल वक्तव्य करणारे गृह राज्यमंत्री आणि पुणे जिल्हा पालकमंत्री व परिवहन मंत्री यांनी राजीनामा द्यावा .अशी मागणी करण्यात आली. यावेळी समाजवादी पार्टी पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत सागरबाई मनोहर, प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद, दिपक गायकवाड, शैलेंद्र मोरे, काॅम्रेड दिपक पाटील, शेतकरी नेते कांतीलाल गवारे, राष्ट्र सेवा दलाचे संदेश दिवेकर, अली शेख, समाजवादी पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक लांबे, अशोकराव गायकवाड,स.पा.पुणे शहर सचिव इरफान भाई शेख,अँड अनिता देशमुख,स.पा.सचिव शहाजहान झारी , इब्राहिमभाई यवतमाळवाले,दानिश जनवाडकर,अजित कारकूड, विनोद कांबळे व इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजवादी पार्टी पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस दत्ता पाकिरे यांनी केले. या तिन्ही नराधमांना सार्वजनिक रित्या प्रतिकात्मक शेण दान करुन व त्यांच्या पुतळ्यांना जोडे मारून अभिनव आंदोलन करण्यात आले.