*पुण्याची प्रतिष्ठेची “ मिस्टर पुणे “ होणार ७ मार्च २०२५ ला*

*पुण्याची प्रतिष्ठेची “ मिस्टर पुणे “ होणार ७ मार्च २०२५ ला*

   ( २५० पेक्षा जास्त स्पर्धक घेणार सहभाग )

पुणे (प्रतिनिधी ) :        फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे व पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना , पिंपरीचिंचवड शरीरसौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने

व ट्रू व्हिजन ( True Vision ) यांच्या प्रमुख प्रायोजकत्वाने पुण्याची प्रतिष्ठेची समजली जाणारी व वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने खेळाडू वाट पाहतात अशी *“मिस्टर पुणे “* हि स्पर्धा शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे आयोजित केली आहे .

        हि स्पर्धा महिला व पुरुष शरीरसौष्ठव तसेच वय वर्ष ४० व ५० वर्षावरील खेळाडूंसाठी मास्टर आणि मेन्स फिजिक अशा १२ गटात हि स्पर्धा होणार आहे . 

        या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पुणे जिल्हयाचे नाव या खेळाच्या माध्यमातुन राष्ट्रिय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणाऱ्या खेळाडूंच्या नावाने प्रत्येक गट त्या खेळाडूला समर्पित ( Dedicate )करण्यात येणार आहे . अशा पद्धतीची संकल्पना या खेळात पहिल्यांदाच होत आहे . 

        या स्पर्धेत २५० हून अधिक स्पर्धक सहभागी होतील त्यांच्या साठी रोख रक्कम , मानचिन्ह व प्रशतीपत्रक अशा स्वरुपाची अंदाजे ३५००००/- पारितोषिके देण्यात येणार आहेत . 

  स्पर्धेची वजन ,वय , उंची  तपासणी त्याचदिवशी सकाळी १० ते १ या वेळेत तर स्पर्धा ४ ते १० वेळेत संपन्न होईल अशी माहिती फेडरेशनचे सचिव श्री दिलीप धुमाळ यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click To Whatsapp