147 Views
पुण्याच्या केसनंद गावात २०-२५ अवैध स्क्रॅप दुकानं बिनधास्त सुरू! ना परवाना, ना परवानगी –ग्रामस्थ संतप्त, प्रशासन मात्र झोपेत! आता कारवाई होणार का?
-
-
काही दिवसांपूर्वी कुदळवाडी परिसरात अवैध स्क्रॅप दुकानांवर कारवाई झाल्यानंतर, आता पुणेच्या पूर्व भागातील केसनंद, गावात अशाच प्रकारच्या दुकानांनी उघडपणे आपला विस्तार केला आहे. या दुकानांमुळे गावात कचऱ्याचं साम्राज्य, प्रदूषण, तसेच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थ संतप्त आहेत. विशेष म्हणजे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.