Home » ब्लॉग » “चहा-बनमस्का आणि दिलखुलास गप्पा!”

“चहा-बनमस्का आणि दिलखुलास गप्पा!”

Facebook
Twitter
WhatsApp
51 Views

शिरूरमध्ये आमदार रोहित पाटील यांची सदिच्छा भेट; चहा-बनमस्कासोबत रंगल्या दिलखुलास गप्पा

 

शिरूर (प्रतिनिधी) – तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे लोकप्रिय आणि महाराष्ट्राचे सर्वात युवा आमदार रोहित आर. आर. पाटील नुकतेच एका कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांची युवा नेते अॅड. संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली. या प्रवासादरम्यान दोघांनी एका छोट्याशा हॉटेलवर थांबून मस्तपैकी चहा-बनमस्का घेत दिलखुलास गप्पा रंगल्या.

या गप्पांमध्ये ग्रामीण भागातील विकास, तरुणांच्या संधी, सामाजिक बदल, आणि राज्यातील सद्यस्थितीवर विचारमंथन झाले. आमदार रोहितदादांची भाषणशैली जितकी प्रभावी आहे, तितकीच त्यांची सामान्यांशी संवाद साधण्याची शैलीही मन जिंकणारी आहे. त्यांच्या विचारसंपन्न दृष्टिकोनामुळे अनेक तरुण नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळत आहे.

विधिमंडळात दमदार आणि मुद्देसूद भाषण देणाऱ्या रोहितदादांचा आत्मीयतेने संवाद साधण्याचा हा अनुभव उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!