Home » गुन्हा » वाघोलीतील बियर शॉपीचा परवाना रद्द करा – संदीप सातव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, २५ एप्रिलला तीव्र आंदोलनाचा इशारा

वाघोलीतील बियर शॉपीचा परवाना रद्द करा – संदीप सातव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, २५ एप्रिलला तीव्र आंदोलनाचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
238 Views
  • “बेकायदेशीर बिअर शॉपीविरोधात संताप!”

  • गगन अदिरा परिसरातील Booze Craving शॉपी नियमबाह्य – महिलांमध्ये भीती, नागरिक त्रस्त. संदीप सातव यांचा इशारा –

 “नियम धाब्यावर, शॉपी बेकायदेशीर – आता सहन केला जाणार नाही!” अशा शब्दांत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी Booze Craving Beer And Wine Shop या बियर शॉपीविरोधात आक्रमक पवित्रा घेत, परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकारी राजपूत यांच्याकडे नागरिकांच्या स्वाक्षरीसह सादर केली आहे.
गगन अदिरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात वसलेल्या या बियर शॉपीला परवाना देताना नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नाही, तसेच इतर कायदेशीर अटी व नियमांचाही भंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मद्यविक्रीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत आणि लहान मुलांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
“निवासींच्या भावना आणि परिसरातील सामाजिक वातावरण लक्षात घेता, सदर परवाना तत्काळ रद्द झाला पाहिजे. अन्यथा, शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता बियर शॉपीसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा संदीप सातव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!