363 Views
खराडीतील सिल्व्हर सोल स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून ६ महिलांची केली सुटका. स्पाचा मालक पसार . गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.
पुणे – खराडी येथील थिटे नगरमध्ये गोल्ड प्लाझा बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या ‘सिल्व्हर सोल स्पा, ब्युटी अॅण्ड वेलनेस’ या मसाज सेंटरमध्ये स्पाच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी धाड टाकून ६ पीडित महिलांची सुटका केली आहे.
खराडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकासह छापा टाकला. छाप्यादरम्यान तीन थायलंडमधील, एक नागालँड, एक मणिपूर आणि एक पुण्यातील महिला वेश्याव्यवसायात आढळून आल्या.
स्पाच्या काउंटरवर मिळालेल्या मॅनेजरकडून स्पाचा मालक विकास किशोर ढाले (रा. अमरावती) असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईत लेनखोकै किपगेन (रा. मणिपूर) यास अटक करण्यात आली असून, गुन्हा क्रमांक ६९/२०२५ नुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा व भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीस न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, विकास ढाले याचा शोध सुरू आहे.पीडित महिलांना न्यायालयासमोर हजर करून महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, अंमलदार नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अर्जुन बुधवंत, अमोल भिसे, सचिन पाटील, अक्षय गार्डे, सुरज जाधव, जयवंत श्रीरामे, तसेच महिला अंमलदार ज्योती मेमाणे, पूजा डहाळे, अर्चना गोफणे यांनी केली.