Home » राजकारण » कदमवाकवस्तीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न; शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव

कदमवाकवस्तीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न; शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव

Facebook
Twitter
WhatsApp
57 Views
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील क्रियान्स स्कूलमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२१ वा भाग उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर शाळेतील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षकांचा तसेच स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेसंबंधी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन संधी व उपक्रमांची माहिती देण्यात आली.
तर भाजपा हवेली तालुका (नगररोड) अध्यक्षपदी विजय जाचक व (सोलापूररोड) अध्यक्षपदी गणेश चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर, स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका पोर्णिमाताई शेवाळे, कन्या प्रशालेच्या शिक्षिका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
सत्कार आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गामध्ये नवी प्रेरणा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!