Home » ब्लॉग » प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी प्रश्नमंजुषा स्पर्धा; दररोज एक पैठणी साडी जिंका

प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी प्रश्नमंजुषा स्पर्धा; दररोज एक पैठणी साडी जिंका

Facebook
Twitter
WhatsApp
138 Views

प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त ८ मेपासून सुरू होणार प्रश्नमंजुषा स्पर्धा! यामध्ये घरबसल्या भाग घ्या आणि दररोज एक भव्य पैठणी साडी जिंका. भाग घेण्यासाठी आपला नाव, गाव आणि व्हॉट्सअ‍ॅप नंबर ८९५६१४४९९१ वर पाठवा

लोणीकंद गावचे सुपुत्र पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा विद्याधर कंद यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त एक अद्वितीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन पै. संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे, ज्यामध्ये घरबसल्या सहभागी होऊन दररोज एक भव्य पैठणी साडी जिंकता येणार आहे.
स्पर्धेची सुरुवात ८ मेपासून होणार असून, दररोज रात्री ८ वाजता मोबाईलद्वारे स्पर्धकांना एक प्रश्न पाठविला जाईल. प्रत्येक प्रश्नासोबत चार पर्याय असतील, आणि योग्य उत्तराचा क्रमांक सर्वात जलद पाठवणाऱ्याला दिवसभरातील विजेता म्हणून घोषित केले जाईल. विजेत्यांना पैठणी साडी प्रदान केली जाईल, ज्यामुळे या स्पर्धेला विशेष आकर्षण मिळेल.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुकांना आपले नाव, गाव आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ८९५६१४४९९१ या नंबरवर टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे, ही स्पर्धा फक्त शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मर्यादित आहे.
स्पर्धेसाठी क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष पै. संदीप उत्तमराव भोंडवे यांनी नागरिकांना “घरबसल्या पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळवण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवा,” असे आवाहन केले आहे.
या स्पर्धेत भाग घेऊन घरबसल्या एक उत्कृष्ट पारंपरिक पैठणी साडी जिंका आणि प्रदीप कंद यांच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!