Home » ताज्या बातम्या » उत्कृष्ट कामगिरीची दखल : वढू बुद्रुकचे पोलीस जयसिंग भंडारे पाटील यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव

उत्कृष्ट कामगिरीची दखल : वढू बुद्रुकचे पोलीस जयसिंग भंडारे पाटील यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव

Facebook
Twitter
WhatsApp
77 Views

वढू बुद्रुकचे पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांना ग्रामसुरक्षा, पोलिस प्रशासनाशी समन्वय आणि प्रभावी कामगिरीबद्दल पुण्यात विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते गौरविण्यात….

गाव पातळीवर कायदा-सुव्यवस्था राखताना प्रामाणिक सेवा, तत्परता आणि जनतेशी सुसंवाद याचे उजळ उदाहरणं ठरलेल्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा गौरव सोहळा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पाषाण चव्हाणनगर, पुणे येथे पार पडला. जयसिंग भंडारे पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रात पोलिस प्रशासनाशी समन्वय, गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता, तसेच स्थानिक वाद-विवाद शांतीपूर्ण मार्गाने मिटवण्याची प्रभावी भूमिका पार पाडली आहे.
यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस पाटील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भंडारे पाटलांचा हा सन्मान गावपातळीवर कार्यरत असलेल्या इतर पोलीस पाटलांसाठी नवा  प्रेरणास्त्रोत ठरत असून, ग्रामसुरक्षेच्या कामगिरीची ही एक सकारात्मक दखल ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!