Home » राजकारण » श्री रामेश्वर पतसंस्थेवर रामेश्वर पॅनेलचा दबदबा; १३ पैकी १३ जागांवर एकहाती विजय

श्री रामेश्वर पतसंस्थेवर रामेश्वर पॅनेलचा दबदबा; १३ पैकी १३ जागांवर एकहाती विजय

Facebook
Twitter
WhatsApp
78 Views
पुणे : नांदेड परिसरातील जेपीनगर येथील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाळासाहेब हगवणे यांच्या नेतृत्वाखालील श्री रामेश्वर पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत संपूर्ण १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली.या निवडणुकीत १३ पैकी ४ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या मतदानात रामेश्वर पॅनेलने ९० टक्क्यांहून अधिक मते मिळवत भरघोस मतांनी विजय मिळवला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
सर्वसाधारण गटात: सचिन दशरथ दांगट, विकास पंढरीनाथ दांगट, अभिजित सोपान घुले, बाळासाहेब काळुराम घुले, बाळासाहेब अर्जुनराव हगवणे, राजेंद्र गणपत हगवणे, देवीदास एकनाथ लगड, विलास साधू मते,विशेष मागास प्रवर्गातून: राजेश शंकर देवकर ,बिनविरोध निवड: विनादेवी विजय मते, मनीषा भगवान मोरे, विकास रामदास कोल्हे, नागेश सोपान शिंदे
या विजयामुळे श्री रामेश्वर पॅनेलचे नेतृत्व अधिक बळकट झाले असून, संस्थेच्या विकासासाठी पुढील काळात ठोस निर्णय घेण्यावर भर देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!