Home » ताज्या बातम्या » उद्योजकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘ओल्ड सोल विंटेज कॅफे’चे भव्य उद्घाटन खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते

उद्योजकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘ओल्ड सोल विंटेज कॅफे’चे भव्य उद्घाटन खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते

Facebook
Twitter
WhatsApp
84 Views
वाघोली (पुणे) – नव्या पिढीच्या कल्पकतेला आणि व्यवसायवृत्तीला चालना देणारा उपक्रम “ओल्ड सोल विंटेज कॅफे” याचा भव्य शुभारंभ बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, वाघोली येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या समोर संपन्न होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकनेते खासदार डॉ. निलेश लंके यांच्या शुभहस्ते होणारे उद्‌घाटन.तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माऊली (आबा) कटके (शिरूर-हवेली), आमदार बापूसाहेब पठारे (वडगावशेरी), आमदार चेतन दादा तुपे (पाटील) (हडपसर), शासन नियुक्त नगरसेवक अजित (आबा) दत्तात्रय घुले, उद्योजक तुषार सातव (यशोदा समूह), पिडीसीसी बँकेचे संचालक सुरेश (अण्णा) घुले, युवा उद्योजक लक्ष्मण (सोनू) शिंदे, तसेच श्री महागणपती समाजसेवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबाजी कोंडीबा येवले हे मान्यवर उपस्थित राहून नवउद्योजकांना शुभेच्छा देणार आहेत.
हा कॅफे केवळ एक व्यवसाय नसून, ग्रामीण व निमशहरी भागातील तरुणांनीही उद्योजकतेकडे वळावे, यासाठी प्रेरणादायी ठरणारा एक आदर्श आहे. सामाजिक सलोखा, कलात्मकता आणि चविष्टतेचा संगम असलेला हा कॅफे पुणेकरांसाठी एक आगळा अनुभव ठरेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!