148 Views
महावितरण वाघोली शाखेत जुने ट्रान्सफॉर्मर गायब ? झाल्याचा लाखोंचा ; अधिकारी–ठेकेदारांच्या संगनमताचा संशय, काही ट्रान्सफॉर्मर परत, अनेक अजूनही बेपत्ता; पोलिसांत तक्रार न केल्याने कारवाईबाबत प्रश्नचिन्ह.
पुणे (प्रतिनिधी): महावितरणच्या वाघोली विभागात वितरण व्यवस्थेत मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. लो टेन्शन (LT) ग्राहकांना हाय टेन्शन (HT) सेवेत रूपांतरित करताना नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले, मात्र त्या बदल्यातील जुने ट्रान्सफॉर्मर विभागाच्या गोदामात जमा झालेलेच नाहीत. त्यामुळे लाखोंच्या संशयास्पद गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महावितरणच्या नियमानुसार, जुने ट्रान्सफॉर्मर गोदामात परत आणून नोंदणी करणे बंधनकारक असते. मात्र, वाघोली शाखेतील काही आजी-माजी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने ट्रान्सफॉर्मर गायब करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
काही ट्रान्सफॉर्मर परत – अनेक अजूनही बेपत्ता!
या प्रकरणात काही ट्रान्सफॉर्मर महावितरणने परत मिळवले आहेत, परंतु अनेक अद्यापही बेपत्ता आहेत. चौकशी रखडलेली असून, आजवर संबंधित शाखेकडून पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, ही बाब अधिकच संशयास्पद ठरत आहे.
‘दोषींवर कारवाई कधी?’ – संतप्त नागरिकांचा सवाल
इतक्या गंभीर गैरप्रकारातही दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिक आणि कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. “पारदर्शक चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी जोरदार मागणी आता जनतेकडून होत आहे.
तक्रारीबाबत दुहेरी भूमिका?
सर्वसामान्य तांत्रिक बिघाडांवरही वाघोली शाखा तत्काळ पोलिस तक्रार दाखल करते. मग अशा गंभीर आर्थिक गैरव्यवहारात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ का? असा प्रश्न उपस्थित होतोय
याबाबत सविस्तर लवकरच….