Home » ब्लॉग » पिंपरी दुमालात 21 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; गावाच्या प्रगतीला नवे बळ

पिंपरी दुमालात 21 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; गावाच्या प्रगतीला नवे बळ

Facebook
Twitter
WhatsApp
244 Views

शिरूर  तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे 21 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पडले पार 

पिंपरी दुमाला (ता. शिरूर)ग्रामपंचायत पिंपरी दुमाला येथे सुमारे 21 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहकारमंत्री  दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व पंचायत समितीचे मा. सभापती विश्वास कोहकडे यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले.
या प्रसंगी  शिरूर खरेदी-विक्री संघाचे संचालक लहू थोरात, माजी संचालक दत्तात्रय कदम, सरपंच महेंद्र डोळस, उपसरपंच निकिता विजय खेडकर, माजी उपसरपंच माणिक म्हाळसकर, जयश्री संदीप सोनवणे, शरद खळदकर, ग्रामपंचायत सदस्य तेजश्री चिखले, सो. देवस्थान अध्यक्ष अभिषेक शेळके, माजी अध्यक्ष सुनील सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल चिखले, खजिनदार शेखर पाटेकर, सचिव श्रीकांत सोनवणे, माजी उपसरपंच अशोक दुर्गे, पोलीस पाटील संतोष जाधव, ग्रामपंचायत सदस्य कोमल डोळस, जितू दुर्गे, आदित्य चिखले, विलास माशेरे, दौलत चिखले, अरुण चिखले, रंगनाथ शेलार, माजी सदस्य शहाजी जगदाळे, बबन पाटेकर, नितीन शेलार, तुषार जगदाळे, सुरेश डोळस, आबा चिखले, एचआर संतोष चिखले, शुभम चिखले, तेजस चिखले आणि माजी उपसरपंच कचरदास डोळस आदींसह मान्यवर उपस्थित होते.लवकरच मार्गाचे काम पूर्ण होणार असून, गावाच्या अंतर्गत जोडरस्त्यांचे काँक्रिटीकरण व अन्य पायाभूत सुविधांची उभारणी या कामांतून करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पिंपरी दुमाला यांच्या वतीने या सुंदर व शिस्तबद्ध उद्घाटन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.
या विकासकामांमुळे गावातील नागरिकांना सोयीसुविधा प्राप्त होणार असून, पिंपरी दुमालाची वाटचाल विकासाच्या दिशेने अधिक गतिमान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!